TRENDING:

पुणेकरांनो! 'थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवण्याचा विचारही करू नका; RTO नं आधीच उचललं हे मोठं पाऊल

Last Updated:

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. मद्याच्या नशेत वेगवान गाडी चालवल्यामुळे अनेकदा गंभीर अपघात होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणेकरांनो, नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटताना वाहतुकीचे नियम मोडणे आता महागात पडू शकते. थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या निमित्ताने होणारी गर्दी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) कंबर कसली आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी शहरात सहा विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
RTO नं कंबर कसली (AI Image)
RTO नं कंबर कसली (AI Image)
advertisement

कठोर कारवाईचा इशारा: या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, जर एखादा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना आढळला, तर केवळ दंड आकारला जाणार नाही. तर त्याचे वाहन चालक परवाना थेट निलंबित करण्याची प्रक्रिया आरटीओकडून राबवली जाणार आहे. शहरातील मुख्य चौक, महामार्ग आणि शहराबाहेरील ढाबे, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या परिसरातील रस्त्यांवर ही पथके 'ब्रेथ ॲनालायझर' मशीनसह सज्ज असणार आहेत.

advertisement

2 आठवडे कॉलेजला दांडी; वडिलांनी विचारला जाब, रागात पुण्यातील तरुणानं केलं असं की पोलीसही चक्रावले

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. मद्याच्या नशेत वेगवान गाडी चालवल्यामुळे अनेकदा गंभीर अपघात होतात. हे टाळण्यासाठी आरटीओची ही पथके रात्रभर गस्त घालणार आहेत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले आहे की, रस्ता सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असून नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

advertisement

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ४२ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आकुर्डी परिसरात सापळा रचून अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आलिशान कारमधून चाललेली गांजाची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५५ किलो ५७५ ग्रॅम गांजा हस्तगत केला असून चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो! 'थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवण्याचा विचारही करू नका; RTO नं आधीच उचललं हे मोठं पाऊल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल