सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित
अशातच आता या प्रकरणात वैष्णवी हागवणे हुंडाबळी प्रकरणात सत्र न्यायालयाने सहा आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणात जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. आता न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून खटल्याची सुनावणी 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
सासरी टोकाचं पाऊल उचललं
advertisement
सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने सासरी टोकाचं पाऊल उचललं होतं. वैष्णवीचा मृतदेह भुकूम येथील सासरी 16 मे रोजी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद झाल्याने आत्महत्या की खून? याबाबत संशय निर्माण झाला होता. या प्रकारणाने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. अशातच आता आरोप निश्चिती करण्यात आली आहे.
कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी
हगवणे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. मग तपासाची सूत्र वेगाने हलू लागली. पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचे पती शशांक हागवणे, सासू लता हागवणे, नणंद करिश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दीर सुशील हागवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली.
वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दरम्यान, 17 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ मारहाण, कट रचणे तसेच पुरावे लपवण्याचे आरोप आहेत. निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवणे आणि धमकावल्याचा अतिरिक्त आरोप आहे.
काय आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण?
दरम्यान, वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नाच्या वेळीच 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि सूचवलेल्या कार्यालयात लग्न लावून देण्याचे मान्य करुन घेण्यात आले होते. मात्र, तिचे सासू, सासरे आणि नवरा यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिच्याशी भांडणं करायला सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला. लग्नाच्या चार ते पाच महिन्यानंतर वैष्णवीच्या सासू लता हगवणे यांनी चांदीच्या भांड्यांची मागणी केली. ती दिली नाहीत म्हणून तिला त्रास देणे सुरू केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला.
