TRENDING:

Pune Traffic: तुम्हालाही आला मेसेज? 19 लाख पुणेकर वाहनचालकांवर टांगती तलवार, लायसन्स निलंबित होणार?

Last Updated:

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत थकीत दंड असलेल्या वाहनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर नोटीस पाठवण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरातील वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि दंड थकविणाऱ्या वाहनधारकांसाठी आता धोक्याची घंटा वाजली आहे. शहर वाहतूक शाखेने थकीत दंड वसुलीसाठी कंबर कसली असून, सुमारे १९ लाख प्रलंबित चलन आणि ४०० कोटी रुपयांच्या थकीत दंडासाठी आता थेट 'लायसन्स निलंबना'चे हत्यार उपसले आहे.
19 लाख पुणेकर वाहनचालकांवर टांगती तलवार (फाईल फोटो)
19 लाख पुणेकर वाहनचालकांवर टांगती तलवार (फाईल फोटो)
advertisement

पुढील ४ दिवस महत्त्वाचे

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत थकीत दंड असलेल्या वाहनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर नोटीस पाठवण्यात येणार आहे. (MHPECH-G) या अधिकृत कोडवरूनच हे एसएमएस (SMS) येतील. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम न भरल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

advertisement

थकीत दंड न भरल्यास थेट परवाना रद्द?

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ३० दिवसांच्या मुदतीत दंड न भरल्यास संबंधित चालकाचा परवाना (Driving License) निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) पाठवण्यात येईल. संबंधित प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात येईल, ज्यामुळे वाहनधारकांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.

advertisement

सायबर फसवणुकीपासून सावध राहा

नोटीस पाठवण्याच्या या प्रक्रियेत सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार, पोलीस कधीही APK फाईल पाठवत नाहीत, ती डाउनलोड करू नका. कोणालाही आपला OTP शेअर करू नका. तसंच केवळ अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरूनच दंड भरावा. संशयास्पद मेसेज आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

advertisement

दंड कुठे आणि कसा भरायचा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

वाहनधारक अधिकृत संकेतस्थळ https://mahatrafficechallan.gov.in किंवा 'पुणे ट्रॅफिक पोलीस' (PTP) या मोबाईल ॲपवरून आपला दंड भरू शकतात. याशिवाय जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात जाऊन क्यूआर कोड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारेही दंड भरण्याची सोय उपलब्ध आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune Traffic: तुम्हालाही आला मेसेज? 19 लाख पुणेकर वाहनचालकांवर टांगती तलवार, लायसन्स निलंबित होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल