नाना पेठेतील गोविंद कोमकर हत्येनंतर दोन दिवस उलटूनही त्याचा मृतदेह अद्याप ससून रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. या हत्येनंतर कोमकर कुटुंबात शोककळा पसरली असून अंत्यसंस्काराची प्रतीक्षा सुरु आहे. मृत गोविंदचे वडील गणेश कोमकर सध्या नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ते वनराज आंदेकर हत्येप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यामुळे गोविंदच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांनी पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्यानुसार वडील गणेश कोमकर यांचा पॅरोल अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
काका-काकूचा जामीन अर्ज फेटाळला
याशिवाय गोविंदच्या काकू संजिवनी आणि काका जयंत कोमकर यांनीही पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या दोघांच्या अर्जाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पॅरोल मंजुरीनंतर गणेश कोमकर यांना पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, त्यानंतरच गोविंदच्या अंत्यसंस्काराची वेळ निश्चित केली जाणार आहे. रविवारी (७ सप्टेंबर) संध्याकाळपर्यंत किंवा उद्या (८ सप्टेंबर) सकाळी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वडिल पॅरोलवर बाहेर येणार
गोविंदच्या हत्येनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली होती. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. गोविंदचा खून हा वनराज आंदेकर प्रकरणाशी संबंधित असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आंदेकरच्या हत्येला वर्ष झाल्यानंतर तीन दिवसातच गोविंदचा जीव घेण्यात आला, त्यामुळे दोन्ही खुनांचा थेट संबंध जोडला जात आहे.
अंत्यसंस्कारावेळी सुरक्षेची विशेष खबरदारी
सध्या कोमकर कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत आहेत. मृतदेह ससूनमध्ये ठेवण्यात आल्याने परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि समर्थक मोठ्या संख्येने येत आहेत. अंत्यसंस्काराला गणेश कोमकर उपस्थित राहणार आहे. पोलिसांनी अंत्यसंस्कारावेळी सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा :