संविधानाने मला दिलेला अधिकार...
वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रणालीवर आक्षेप घेत आहेत. अशातच आता येत्या आठवड्यात पुण्यात काहीतरी धमाका करणारं होणार, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. संविधानाने मला दिलेला अधिकार असं म्हणत वसंत मोरे यांनी पेनाचा फोटो शेअर केला आहे. तयारी पुर्ण झाली आहे. आता काउंटडाउन सुरु, असंही वसंत मोरे म्हणाले.
advertisement
नेमकं पोस्टमध्ये काय म्हटलंय?
संविधानाने मला दिलेला अधिकार (लेखणीचा) तो येणाऱ्या आठवड्यात पुण्यामध्ये धमाका करणारा असेल. तयारी पुर्ण झाली आहे. आता काउंटडाउन सुरु, असं म्हणत वसंत मोरे यांनी एल्गार केला आहे.
पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ
दरम्यान, ‘महापालिका निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी प्रशांत जगतापांनी भाजपाबरोबर हातमिळवणी केली आणि गरज नसताना माझ्या प्रभागात उमेदवार दिले’, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एका ठिकाणी एक उमेदवार दिला, तरी देखील त्या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 2 असे 5 उमेदवार तुम्ही माझ्याच प्रभागात का दिले? असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला होता.
