नेमकी घटना काय?
योगेश श्याम दुनघव (वय १६) असे घर सोडून गेलेल्या मुलाचे नाव आहे. तो खडकी येथील टिकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून योगेश महाविद्यालयात जात नसल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले होते. याबाबत वडिलांनी त्याला विचारणा केली. तर, त्याने आपण क्रिकेट खेळण्यासाठी कॉलेजला दांडी मारल्याची कबुली दिली. या कारणावरून वडिलांनी त्याला समज देत जाब विचारला. वडिलांनी रागावल्याचा राग मनात धरून योगेशने कोणालाही काहीही न सांगता घर सोडले.
advertisement
Pune News: हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा; पुणेकरांनी भरले लाखो रूपये, पुढं घडलं असं की झोप उडाली
योगेश बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधमोहीम राबवली, मात्र तो सापडला नाही. अखेर योगेशच्या कुटुंबीयांनी येरवडा पोलिसांत धाव घेतली. मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे योगेशचा शोध सुरू केला आहे.
