TRENDING:

पुणेकरांनो रात्री घराबाहेर पडताना सावधान! वानवडीत तिघांनी रिक्षा अडवली, प्रवाशाला खाली उतरवलं अन् कांड

Last Updated:

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात आता रात्रीच्या वेळी प्रवास करणंही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. वानवडी परिसरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तीन दुचाकीस्वार चोरट्यांनी भररस्त्यात अडवलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात आता रात्रीच्या वेळी प्रवास करणंही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. वानवडी परिसरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तीन दुचाकीस्वार चोरट्यांनी भररस्त्यात अडवलं. यानंतर धक्काबुक्की करत ६० हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
तीन तरुणांनी रिक्षा अडवून लुटलं (प्रतिकात्मक फोटो)
तीन तरुणांनी रिक्षा अडवून लुटलं (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ७५ वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरिक शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रिक्षाने वानवडी परिसरातून जात होते. रिक्षा मथुरावाला मैदानाजवळ पोहोचली असता, तिथे असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन एका दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी रिक्षा अडवली. आरोपींनी रिक्षात बसलेल्या ज्येष्ठाला बाहेर ओढले आणि त्यांना जबरदस्तीने धक्काबुक्की करत त्यांच्याकडील ६० हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली.

advertisement

बंगल्यात एकटीच राहायची पुण्यातील महिला; 2 दिवस माहेरी गेली, रात्री घरी परतताच खोलीतलं दृश्य पाहून हादरली!

मथुरावाला मैदानालगत असलेल्या पथदिव्यांच्या अभावामुळे आणि अंधारामुळे आरोपींनी हे धाडस केले. लुटमार केल्यानंतर आरोपी दुचाकीवरून वेगाने पसार झाले. या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: ऊन तापलं, मार्केट हाललं, लिंबू, केळीच्या आवकेत घट; द्राक्षे, कांद्याला कुठं मिळाला भाव?
सर्व पहा

वानवडी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. एकट्या प्रवाशांना, विशेषतः वृद्धांना लक्ष्य करणाऱ्या या टोळीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो रात्री घराबाहेर पडताना सावधान! वानवडीत तिघांनी रिक्षा अडवली, प्रवाशाला खाली उतरवलं अन् कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल