TRENDING:

Sharad Mohol : ...म्हणून घरासमोरच शरद मोहोळला ठार मारलं, Exclusive माहिती समोर

Last Updated:

कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकरने गोळीबार केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
...म्हणून घरासमोरच शरद मोहोळला ठार मारलं, Exclusive माहिती समोर
...म्हणून घरासमोरच शरद मोहोळला ठार मारलं, Exclusive माहिती समोर
advertisement

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्यावर पुण्यात दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. शरद मोहोळ याच्यावर त्याच्या घराजवळच कोथरुडच्या सुतारदरा भागात 150 मीटर अंतरावर गोळ्यांचे चार राऊंड फायर करण्यात आले. गोळीबारानंतर मोहोळला कोथरुडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

advertisement

शरद मोहोळ याच्यावर नेमका कुणी हल्ला केला? याबाबत पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी पोलीस मुन्ना पोळेकर आणि इतर हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद मोहोळ याच्यावर त्याच्याच साथीदाराने हल्ला केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

advertisement

शरद मोहोळला मारणारा दुसरा तिसरा कुणी नाही, गॅंगमधलाच साथीदार निघाला, PHOTO आला समोर

पोळेकर-मोहोळमध्ये काय वाद झाला?

जमिनीच्या वादावरून आठ दिवसांपूर्वी पोळेकर आणि शरद मोहोळ याची बाचाबाची झाली होती, त्याच वादातून हा खून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुळशी तालुक्यातील मुठा हे शरद मोहोळ याचं गाव आहे, त्याच्याच आसपास पोळेकरची जमीन आहे. या जमिनीच्या खरेदी विक्रीवरून वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी शरद मोहोळने मुन्ना पोळेकरला बोलवून त्याला या प्रकरणात मारहाणही केली होती, त्याचाच राग धरून पोळेकरने शरद मोहोळची हत्या केली आहे, असं सांगितलं जातंय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

शरद मोहोळचा झाला गेम, लग्नाच्या वाढदिवशी घरासमोरच गोळ्या झाडल्या, घटनास्थळाचे PHOTOS

मराठी बातम्या/पुणे/
Sharad Mohol : ...म्हणून घरासमोरच शरद मोहोळला ठार मारलं, Exclusive माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल