या सगळ्या घडामोडीनंतर आता पुण्यातील आणखी एक टोळी चर्चेत आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाणवर पुणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जागेवर ताबा मारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
टिपू उर्फ रिझवान पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. आता एका जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पठाणने संबंधित जागेवर ताबा मारून जागा मालकाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. जागेवरील ताबा सोडण्यासाठी त्याने जागा मालकाकडे 25 लाख रुपये मागितले होते.
advertisement
या प्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिझवान उर्फ टिपू पठाण याच्यासह एकूण 13 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे आयुष कोमकर हत्या प्रकरणात देखील टिपू पठाण टोळीचं नाव समोर आलं होतं. या टोळीनेच आंदेकर टोळीला शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आता पठाणविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.