TRENDING:

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये अचानक हवामान बदल; नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

Last Updated:

Rise In Number Of Patient : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक आणि वारंवार बदल होत आहेत. या बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि डोकेदुखी सारख्या सामान्य आजारांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून अधून-मधून पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात सतत बदल होत आहेत. यामुळेच नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशा त्रासांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. विशेषतहा यात लहान मुले, वृद्ध आणि आधीपासूनच आजारपणाने ग्रस्त लोक या बदलांपासून जास्त प्रभावित होत आहेत.
News18
News18
advertisement

शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे, मेट्रोचे खोदकाम तसेच बीआरटी प्रकल्पाचे काम सुरु आहे. या सर्व कामांमुळे हवेत धूळ आणि सूक्ष्म कणांची मात्रा वाढली आहे. हे धूळ कण विशेषतहा श्वसनसंस्थेवर प्रतिकूल परिणाम करतात. अधून-मधून पडणारा पाऊस आणि धुलीच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणात घसरलेली हवा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करत आहे. पहाटे गारवा आणि दुपारी कडक उन्हाळा यासारख्या बदलत्या हवामानामुळे शरीरावर ताण निर्माण होत आहे आणि त्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी यासारखे त्रास होत आहेत.

advertisement

महापालिकेकडून शहरातील विविध रस्त्यांचे डागडुगे आणि सुधारणा करण्यात येत आहेत. रस्त्याचे खोदकाम, मेट्रो काम आणि इतर सार्वजनिक बांधकामे यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. हवेत प्रदूषण वाढल्यामुळे श्वसनासंबंधित रोग, अलर्जीज, दमा आणि फुफ्फुसाचे आजार अधिक दिसून येत आहेत. शहरातील नागरिकांना केवळ आजारी पडण्याचा धोका नाही तर दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता देखील वाढली आहे.

advertisement

पावसाचा अधून-मधून वारंवार होणारा प्रभाव, ऊन, वारा, धूळ यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. वातावरणातील अशा अचानक बदलांमुळे शरीराचे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत आहे. परिणामी, नागरिकांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत आहेत. रुग्णालयांत वाढती गर्दी याचा पुरावा आहे की शहरातील हवामान आणि पर्यावरणीय बदल थेट आरोग्यावर परिणाम करीत आहेत.

शहरातील लोकांना या परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. घरात राहणे, मास्क वापरणे, नियमित हातधोरणे, गरम पदार्थांचे सेवन आणि शरीराला पुरेशी विश्रांती देणे यामुळे या बदलत्या हवामानाच्या परिणामांपासून संरक्षण मिळू शकते. सार्वजनिक बांधकामांवर निगराणी ठेवणे आणि धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करणे महापालिकेसाठी आवश्यक आहे, अन्यथा नागरिकांचा आरोग्यावरील परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो.

advertisement

या सर्व बाबींमुळे पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांसाठी सध्याची परिस्थिती चिंताजनक ठरली आहे. हवामानातील सतत बदल आणि वातावरणातील प्रदूषण यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा शहरातील आरोग्य समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

मराठी बातम्या/पुणे/
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये अचानक हवामान बदल; नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल