पुण्यातील शुक्रवार पेठ इथे असलेलं आर. एन. बांगड हे 85 वर्ष जुनं दुकान असून इथे ख्रिसमस साठी लागणारे विविध वस्तू या मिळतात. तर ख्रिसमसला अवघे काही दिवस उरले आहेत.बाजारपेठही सज्ज झाली आहे. ख्रिसमसच्या भेटवस्तू, सांताक्लॉज, स्नोमॅन, टेडी बेअरसह अनेक भेटवस्तूंनी दुकाने सजली आहेत. ख्रिसमस ट्री आणि संगीतमय सांताला खूप मागणी असलेली पाहिला मिळत आहे.
advertisement
ट्रीला सजवण्यासाठीच सामान पेपर स्टार, रिंग्स, इतर पॅकेज लूज सामान, स्नो मॅन, सांताक्लॉज या सारख्या बराच वस्तू या मिळतात आणि याची किंमत ही 20 रुपयांपासून सुरू होते. तर ट्रीची किंमत ही 40 रुपयांपासून सुरू होते 2 हजार रुपये पर्यंत आहेत. स्नो, पाईन ट्री प्रकार असून यामध्ये कलर आणि नॉर्मल ही पाहिला मिळतात. छोटा सांता, टेबल ट्री,कलर फुल बॉल,चेरी पॅटर्न, बेल्स पॅटर्न या सारख्या बऱ्याच वस्तू असून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी देखील आहे. अशी माहिती विक्रेते विकास कांबळे यांनी दिली आहे.
Ladki bahin yojana: तुमच्या खात्यावर लाडकी बहीणचे पैसे येणार की नाही, कसं चेक करायचं?