पुणे : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मनोरंजन कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तीन महिन्यानंतर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी अंगविक्षेप करत लावणी सादर करताना सध्या व्हायरल झाला आहे.
advertisement
या संदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, गाव परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेतले जातात. त्याचा व्हिडिओ असल्याचे सांगून संस्थेचा यामध्ये कसलाही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नेमका कधीचा व्हिडीओ आहे?
सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोरगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटी यांच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 6, 7, 8 मे 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात केले होते सदर कार्यक्रमाच्या वेळी मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने विद्यालय बंद होते. त्यामुळे यात्रा कमिटी ग्रामस्थ मोरगाव यांच्या विनंती आणि मागणीवरून तोंडी परवानगी दिली गेली होती. या उत्सवात विद्यालय आणि विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांनी कसलाही सहभाग घेतला नव्हता असे स्पष्टीकरण विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
या VIDEO मध्ये डान्स करणारी महिला 'पाव्हणं नाद करायचा नाय' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. नृत्यदरम्यान ती अश्लील हावभाव देखील करत आहे. आता दहिहंडीच्या दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चहुबाजुने यावर टीका केली जात आहे. मात्र हा व्हिडीओ दहिहंडी सणातील नव्हे तर मे महिन्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमातला असल्याची माहिती मिळतेय. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचा कारभार पाहतात. त्यामुळे विरोधकांकडून या व्हिडिओला धरून काही राजकीय प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. पण हा व्हिडीओ आता जुना असल्याचं समोर आलं आहे.
