चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक झाल्यानंतर ते कोण आहेत? आणि त्यांना नक्की का अटक झाली? याची चर्चा लोक करु लागले आहेत. चला त्याच्याबद्दल थोड सविस्तर जाणून घेऊ.
सोशल मीडियावर प्रसिद्ध प्रसिद्ध असणारे युवा किर्तनकार चैतन्य महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भांबोली गावात झाला. त्यांच्या जन्म 17 ऑक्टोबर 1994 साली झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय, आळंदी येथे झाले असून संत साहित्याचे शिक्षणही त्यांनी येथेच पूर्ण केले. ज्यानंतर त्यांनी 2021 मध्ये लग्न केलं.
advertisement
चैतन्य महाराज हे मदालसा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष आहेत. या संस्थेंच्या माध्यमातून ते वारकरी संत, साहित्याचा प्रचार आणि प्रसार करतात. तसेच, युवा किर्तनकार म्हणून त्यांची समाजात ओळख आहे. युवा वर्गात मोटीव्हेशनल किर्तनकार आणि समाजातील तरुणाईला उपदेश देण्याचं काम ते करतात. त्यांचे अनेक व्हिडीओ हे वादाचा विषय देखील ठरले आहेत. पण असं असलं तरी देखील ते आपले उपदेश देणं सुरुच ठेवतात.
का झाली चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक?
चैतन्य महाराज म्हाळुंगे परिसरात राहतात. त्यांच्या घराशेजारीच एक कंपनी असून तिथल्या वाटेवरून त्यांच्यात वाद आहेत. बुधवारी रात्री कंपनीत जाणारा रस्ता चैतन्य महाराज यांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदल्याचा आरोप आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांनी चैतन्य महाराजांसह त्यांच्या भावांविरोधात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनंतर तिघांना आधी ताब्यात घेण्यात आलं होतं नंतर अटकही केली.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सोडून देखील देण्यात आलं, परंतू त्यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पोहोचली आहे.
