TRENDING:

Pune : पुण्याच्या रस्त्यावर भयानक घडलं, पतीच्या गर्लफ्रेंडला संपवण्याचा कट, पत्नीने केला 'विषारी' हल्ला!

Last Updated:

अनैतिक संबंधांच्या संशयावरून पुण्यात एका 32 वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. या महिलेवर ऍसिड सदृश्य पदार्थ फेकण्यात आला आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : अनैतिक संबंधांच्या संशयावरून पुण्यात एका 32 वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. या महिलेवर ऍसिड सदृश्य पदार्थ फेकण्यात आला आहे, त्यामुळे खळबळ माजली आहे. 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास शिवणे येथील एनडीए रोडवर ही घटना घडली आहे. पीडितेच्या जबाबावरून उत्तमनगर पोलिसांनी हल्ल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुण्याच्या रस्त्यावर भयानक घडलं, पतीच्या गर्लफ्रेंडला संपवण्याचा कट, पत्नीने केला 'विषारी' हल्ला! (AI Image)
पुण्याच्या रस्त्यावर भयानक घडलं, पतीच्या गर्लफ्रेंडला संपवण्याचा कट, पत्नीने केला 'विषारी' हल्ला! (AI Image)
advertisement

आरोपी महिलेला तिचा पती पीडित महिलेसोबत अनैतिक संबंधात असल्याचा संशय आला, त्यावरून आरोपी महिला आणि तिच्या आणखी एका मैत्रिणीने महिलेला पकडले आणि तिला मारहाण केली तसंच तिच्यावर ऍसिड सदृश्य पदार्थ फेकला. एवढच नाही तर आरोपी महिलांनी पीडित महिलेच्या चेहऱ्यावर दगडाने वारही केले.

हल्ल्यादरम्यान एका आरोपी महिलेने बाटलीमधून ऍसिडसारखे ज्वलनशील द्रव्य महिलेच्या चेहऱ्यावर ओतले, त्यामुळे महिलेला जखमा झाल्या आणि त्वचेवर जळजळ सुरू झाली. हल्ल्यानंतर पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. महिलेच्या शरिरावर नेमका कोणतं द्रव्य फेकलं गेलं होतं? याचा तपास करण्यासाठी पोलीस मेडिकल रिपोर्ट आणि फॉरेन्सिक पुराव्यांची वाट पाहत आहेत.

advertisement

बायकोच्या चेहऱ्यावर फेकला उकळता चहा

दरम्यान कौटुंबिक वादातून बायकोच्या चेहऱ्यावर पतीने उकळता चहा फेकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. 23 वर्षीय तरुणी आणि आरोपी 27 वर्षीय पती पुण्यातील पौड रस्त्यावरील भागात राहतात. वर्षभरापूर्वी यांचे लग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. बुधवारी (31 डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास तक्रारदार तरुणी झोपली असताना, पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून पतीने तिच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकला. या घटनेत तरुणीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर रमला शेतीमध्ये, शिंपल्यांपासून मोती उत्पादनाची रचली यशोगाथा, Video
सर्व पहा

कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी पती हा खासगी नोकरी करत आहे.

मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्याच्या रस्त्यावर भयानक घडलं, पतीच्या गर्लफ्रेंडला संपवण्याचा कट, पत्नीने केला 'विषारी' हल्ला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल