बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा प्रकार घडला आहे. तीन महिन्यापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एक तरुणी अंगविक्षेप करत लावणी सादर करताना दिसतेय.
या संदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, गाव परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेतले जातात. त्याचा व्हिडिओ असल्याचे सांगून संस्थेचा यामध्ये कसलाही सहभाग नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोरगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटी यांच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 6,7,8 मे 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात केलं होतं. या कार्यक्रमाच्या वेळी मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने विद्यालय बंद होते. त्यामुळे यात्रा कमिटी ग्रामस्थ मोरगाव यांच्या विनंती आणि मागणीवरून तोंडी परवानगी दिली गेली होती.
या उत्सवात विद्यालय आणि विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांनी कसलाही सहभाग घेतला नव्हता, असंही स्पष्टीकरण विद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
