TRENDING:

Panchak 2025: फेब्रुवारीच्या शेवटी विनाशकारी अग्निपंचक! वाईट प्रसंग घडला तर एकामागे लागू शकते रांग

Last Updated:

Panchak 2025: हा कालावधी एकूण पाच दिवसांचा असतो. पंचकाचे काही प्रकार आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या पंचकाला अग्नि पंचक म्हटले जाईल, जे अत्यंत अशुभ मानले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : धार्मिक शास्त्रांनुसार प्रत्येक महिन्यात असे पाच दिवस येतात, जे अत्यंत अशुभ मानले जातात. या दिवसांत काही कामे करणे निषिद्ध मानले जाते, कारण पंचक काळाचा त्यावर अशुभ परिणाम होऊ शकतो. पंचकादरम्यान शुभ कामे सुरू करू नयेत, कारण त्यामुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. फेब्रुवारीमध्ये अग्नि पंचक कधी आहे आणि या काळात काय करू नये ते जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

पंचक कधी आणि कसे लागते?

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र जेव्हा धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या नक्षत्रांमध्ये प्रवेश करतो तेव्हा पंचक सुरू होतो. हा कालावधी एकूण पाच दिवसांचा असतो. पंचकाचे काही प्रकार आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या पंचकाला अग्नि पंचक म्हटले जाईल, जे अत्यंत अशुभ मानले जाते.

अग्नि पंचकाचा प्रभाव - ज्योतिषांच्या मते, अग्नि पंचकात आगीच्या घटना जास्त घडू शकतात. म्हणून, याकाळात विशेष काळजी घेतली पाहिजे आणि आगीशी संबंधित कोणतीही कृती करताना काळजी घेतली पाहिजे.

advertisement

पंचकाची वेळ - फेब्रुवारीतील पंचक २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:२७ वाजता सुरू होईल आणि ते ३ मार्च रोजी संध्याकाळी ६:३९ वाजता संपेल. या काळात खालील काही कामे टाळावीत.

पंचक दरम्यान काय करू नये?

स्लॅब टाकू नये - तुम्ही नवीन घर बांधत असाल तर पंचकादरम्यान स्लॅब टाकू नका, अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

advertisement

कोणतेही नवीन काम सुरू करू नका - पंचक दरम्यान कोणतेही नवीन काम सुरू करणे अशुभ आहे.

दक्षिण दिशेला प्रवास करू नका - दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, म्हणून पंचक दरम्यान या दिशेला प्रवास केल्याने अपघात होण्याची शक्यता वाढते.

शुभ कामे करू नका - पंचकमध्ये, विशेषतः अग्नि पंचकात, लग्न, गृहप्रवेश आणि इतर शुभ कामे करू नयेत.

advertisement

सव्वाबारा ते...! माघी संकष्टीला गणेश पूजेचा अभिजित मुहूर्त चुकवू नका; गणेश कृपा

पंचकमध्ये काय करावे?

शास्त्रांनुसार, पंचकाच्या वेळी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा करावी जेणेकरून पंचकाचे नकारात्मक प्रभाव कमी होतील. यामुळे जीवनात शुभता राहते आणि त्रासांपासून मुक्तता मिळते.

वेळ आपली आहे आता! या 5 राशींची कमाई डबल; त्रिगृही योगात मोठी चिंता मिटणार,खुशखबर

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अवकाळी पावसाने नुकसान झालं पण हार नाही मानली, केली टरबूज शेती, 8 लाखांचा झाला नफा
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Panchak 2025: फेब्रुवारीच्या शेवटी विनाशकारी अग्निपंचक! वाईट प्रसंग घडला तर एकामागे लागू शकते रांग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल