TRENDING:

Akshaya Tritiya: सोनं खरेदी करायला जमणार नाही? अक्षय तृतियेला फक्त 50 रूपये खर्च करून मिळवा पूर्ण लाभ

Last Updated:

Akshaya Tritiya: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. भगवान विष्णूचा सहावा अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस खूप शुभ मानला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सालाबाद प्रमाणे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. भगवान विष्णूचा सहावा अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस खूप शुभ मानला जातो. मत्स्य पुराणानुसार, अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा एक विशेष विधी आहे. अक्षय्य तृतीयेचा सण यंदा आणखी खास असणार आहे. अनेक चांगले ज्योतिषीय योग देखील तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सविस्तरपणे जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व: प्राचीन मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णूचा जन्म त्यांच्या अक्षय्य अवतारात भगवान परशुरामाच्या रूपात झाला होता. धार्मिक मान्यतेनुसार, सत्ययुग, द्वापरयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात अक्षय्य तृतीयेपासून केली जाते. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे.

सोने खरेदीचे महत्त्व: धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कायमचे वास करते.

advertisement

अक्षय तृतीयेवरील विशेष ज्योतिषीय योग: अक्षय तृतीयेचा सण बुधवार, ३० एप्रिल रोजी आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र शोभन योग आणि चंद्र त्याच्या उच्च राशी वृषभ राशीत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधवारी रोहिणी नक्षत्र असेल तर सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो. या दिवशी लग्न, शुभ कार्यक्रम, उद्घाटन, गृहप्रवेश इत्यादी कोणत्याही गोष्टी मुहूर्त न पाहता करता येतात.

advertisement

बुधवारी द्विद्वादश योगात त्रिदेवाची कृपा! या 3 राशींचे भाग्य उजळणार; शुभवार्ता

सोन्याऐवजी ही वस्तू खरेदी करा: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी सोने खरेदी केल्याने आनंद, समृद्धी आणि संपत्ती मिळते, असे मानले जाते. सध्याची महागाई किंवा पैशांच्या अडचणीमुळे सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र, पिवळ्या कवड्या किंवा मातीचे भांडे खरेदी करू शकता. या गोष्टी बाजारात अगदी सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध आहेत. या वस्तू खरेदी केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो, असे मानले जाते.

advertisement

गजलक्ष्मी राजयोग या राशींच्या नशिबात; लवकरच कायापालट करणाऱ्या वार्ता कानी पडणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Akshaya Tritiya: सोनं खरेदी करायला जमणार नाही? अक्षय तृतियेला फक्त 50 रूपये खर्च करून मिळवा पूर्ण लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल