लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त
यंदाच्या वर्षी अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होणार असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता समाप्त होणार आहे. या माहितीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणं शास्त्रसंमत आहे. त्यामुळे मंगळवारी, 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करावे. तसेच, अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे, असे जोशी सांगतात.
advertisement
Diwali Traditions : दिवाळीत शेणाचे दिवे का लावतात? यमराजांनी दिलेल्या या वरदानाशी आहे संबंध..
लक्ष्मीपूजनाची शुभ वेळ कोणती?
लक्ष्मीपूजनासाठी मंगळवारी सकाळी 10:53 मिनिटे ते 12:19 मिनिटे असा लाभ मुहूर्त असणार आहे. तसेच 12:19 ते 1:46 मिनिटान पर्यंत अमृत मुहूर्त असणार आहे. तसेच शुभ मुहूर्त दुपारी 3:12 ते 4:39 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळात तुम्ही कधीही पूजन करू शकणार आहात. तसेच ज्यांना प्रदोष काळात लक्ष्मी पूजन करावयाचे असेल, त्यानी सायंकाळी 7:39 वाजलेपासून ते 9:13 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन करावे.
लक्ष्मीपूजन दुकानात कसं करावं?
बऱ्याच ठिकाणी व्यापारी किंवा दुकानदार लक्ष्मी पूजनाला गादी पूजन देखिल म्हणतात. त्यावरती गणपती पूजन, कलश पूजन करून कलशावर माता लक्ष्मीची मूर्ती अभिषेक करून मंत्र उपचात स्थापित करावी. त्याच प्रमाणे लक्ष्मी देवीला रात्री निद्रा देखील द्यावी. लक्ष्मी पूजनाला अनेक ठिकाणी दौदची पूजा केली जाते. त्याच प्रमाणे वहीची आणि लेखणीची पूजा देखील करावी.
घरी कसं करावं लक्ष्मीपूजन?
आपल्या घरात चौरंगावर एक लाल कपडा अंथरून त्यावर गहू ठेऊन त्यावर कलश स्थापन करावा आणि त्या कलशावर चारही दिशेला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाचे पूजन करावे. दोन विड्याच्या पानावर गणपती ठेऊन गणपती पूजन करावे. या दिवशी गणपती पूजन, लक्ष्मी पूजन आणि कुबेर पूजन त्याच बरोबर आपल्या घरातील धनाची देखील पूजा करावी, असे जोशी सांगतात.