जालना : मराठी नववर्षातील पहिला सण तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा हा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक मराठी माणूस आपल्या घरोघरी गुढी उभारून आनंद उत्सव साजरा करतो. गुढीपाडव्याला गुढी उभारताना कोरे वस्त्र, साडी याबरोबरच कडुनिंबाचा पाला देखील जोडला जातो. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी गूळ आणि कडुलिंबाचा पाला खाण्याची देखील परंपरा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाला एवढं महत्त्व का आहे हे आम्ही जालना शहरातील ज्योतिषी डॉ. राजेश महाराज सामनगावकर यांच्याकडून जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना कडुनिंबाचा पाला वापरला जातो. त्याचबरोबर कडुनिंबाचा पाला आणि गुळाचे सेवन देखील केले जाते. यामागे धार्मिक कारणाबरोबर आरोग्याची देखील कारण आहेत. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर सुतक पाळला जातो, त्याप्रमाणे संवत्सर भेद झाल्यानंतर तीन दिवसांचं सुतक असतं. आणि तो दोष परिहार व्हावा यासाठी म्हणून कडुनिंबाचा पाला आणि गुळाचे सेवन केलं जातं. पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा पाला आणि गुळाचे सेवन केल्याने सुतकाचा दोष लागत नाही.
Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा का साजरा करतात? 99 टक्के लोकांना माहित नाही ही माहिती Video
दुसरे महत्त्वाचे आरोग्याची कारण म्हणजे कडुनिंबाची पाने ही आयुर्वेदामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे असणारी आहेत. कडुलिंबाच्या पाल्यामध्ये अनेक प्रकारचे रोग दूर करण्याची क्षमता आहे. त्यामुळे कडुलिंबाचा पाला आणि गुळाचे सेवन अवश्य करावे. यामुळे त्वचेचे रोग, पोटाचे विकार नाहीसे होतात. त्याचबरोबर आपल्याला चांगला आरोग्य प्राप्त होतं. त्याचबरोबर गुढीला देखील आपण कडुनिंबाचा पाला लावत असतो. यामुळे उष्णताकारक विकार नाहीसे होतात आणि जीवनात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी येते, असं ज्योतिषी राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)