TRENDING:

खुर्चीवर बसल्या-बसल्या पाय हलवण्याची सवय अतिशय बेक्कार; इतक्या गोष्टींवर अशुभ परिणाम

Last Updated:

Sitting Astro Tips: खुर्चीवर बसलेले असताना तर अनेकजण असे पाय हलवताना दिसतात. ही अनेकांची कॉमन सवय असू शकते. पण, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्यापैकी बरेच जण बसल्या-बसल्या उगीचच पाय हलवत राहतात. खुर्चीवर बसलेले असताना तर अनेकजण असे पाय हलवताना दिसतात. ही अनेकांची कॉमन सवय असू शकते. पण, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही सवय आपल्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते. याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतोच, शिवाय त्याचे काही धार्मिक आणि सामाजिक पैलू देखील आहेत, जे दुर्लक्षित करता येणार नाहीत. ज्योतिषी आचार्य पंडित योगेश चौरे यांच्याकडून बसलेले असताना पाय हलवण्याचे तोटे जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

1. चंद्र स्थितीवर परिणाम -

ज्योतिषशास्त्रानुसार, बसताना पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्राच्या स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. चंद्र आपल्या मनाचा आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहे. चंद्र कमकुवत असतो तेव्हा जीवनात ताण, चिंता आणि मानसिक अशांतता असते. यामुळे घरात शांत वातावरण राहत नाही आणि आजारपणाचाही सामना करावा लागू शकतो.

2. मानसिक आणि शारीरिक कमकुवतपणा -

advertisement

एखादी व्यक्ती बसून पाय हलवते तेव्हा त्याचा त्याच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. या सवयीचा मानसिक कमकुवतपणा आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि त्याला त्याच्या निर्णयांमध्ये संकोच वाटू शकतो.

3. लक्ष्मी मातेची नाराजी

बसताना पाय हलवणं हे धनदेवता माता लक्ष्मीसाठी नकारात्मक मानले जाते. या सवयीमुळे घरात पैशाची कमतरता आणि आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. सततच्या या सवयीमुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि भाग्य साथ देत नाही.

advertisement

पाच बोटं सारखी नसतात! कोणत्या बोटात कोणतं रत्न शुभफळ देतं? अचूक वेळ पहा

4. उपासनेतील अशुभ परिणाम

पूजा करताना पाय हलवत राहिल्यास पूजेच्या परिणामांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पूजा करताना मनाची शांती आणि समर्पण आवश्यक आहे, परंतु पाय हलवल्याने ही एकाग्रता बिघडते आणि देवता रुष्ट होऊ शकतात. यामुळे पूजेचे अपेक्षित फळ मिळत नाही.

advertisement

5. जेवताना पाय हलवणे -

काही लोकांना जेवताना खुर्चीवर बसून पाय हलवण्याची सवय असते. याचा घरातील सुख, शांती आणि समृद्धीवरही परिणाम होतो. विशेषतः, या काळात पाय हलवणे हे अन्नदेवतेचा अपमान आहे, ज्यामुळे घरात पैशाची कमतरता आणि समस्या उद्भवू शकतात.

बुधवारी गणेश कृपा! या जन्मतारखा असलेल्यांना खुशखबर मिळणार, लाभाचे योग

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
खुर्चीवर बसल्या-बसल्या पाय हलवण्याची सवय अतिशय बेक्कार; इतक्या गोष्टींवर अशुभ परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल