अमरावती : अमरावती वसियांचे आराध्यदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात गेले कित्येक वर्षांपासून परंपरा सुरू आहे. त्याठिकाणी होळीच्या 1 महिना आधीच होलिका रचण्यात येते. त्यामुळे त्याठिकाणी होलिका दहन पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. माघ पौर्णिमेला ही होळी रचल्यानंतर भाविक भक्त महिनाभर त्या होळीची पूजा करतात. ओटी भरून नवस करतात. त्यानंतर होळीच्या दिवशी होलिका दहन करून याचा समारोप केला जातो. ही परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे.
advertisement
अमरावतीमधील अंबादेवी संस्थानचे मुख्य पुजारी विजयकुमार लेंगे यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, आमच्या इथे माघ पौर्णिमेला होलिका विधिवत स्थापन केली जाते. खरंतर हे हेट्याच वृक्ष आहे. या वृक्षाला पूजाविधी करून होलिका स्थापन केली जाते. दरवर्षी हा नित्यक्रम असतो. स्थापना झाल्यानंतर भाविक भक्त होलिकेची ओटी भरतात. त्याचबरोबर गाठी, शेणाच्या गोवऱ्या सुद्धा अर्पण करतात. सतत माघ पौर्णिमेपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत 1 महिना हा क्रम सुरू असतो. सर्व पूजा साहित्य अर्पण करताना सुखसमृध्दीसाठी भक्त कामना करतात आणि पूजा करतात, असे ते सांगतात.
Amethyst Crystal: मुलांचं अभ्यासात लक्ष नाही? चिंता नको, फक्त 450 रुपयांचं क्रिस्टल करेल काम!
पुढे सांगतात की, शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. नक्की किती वर्ष झाले असतील, हे कोणीही सांगू शकत नाही. यामागचे कारण काही वेगळे नाही. भक्ताच्या मनातील दुःख कमी व्हावं, अग्निमध्ये जाळून राख व्हावं यासाठी ही परंपरा असावी. 1 महिना आधी रचण्याचे कारण हेच की, होलिका सुद्धा एक देवीच रूप आहे. इतर देवींची जशी ओटी भरली जाते. पूजा केली जाते, त्याचप्रमाणे होलिकेची सुद्धा करण्यात यावी. या उद्देशाने या होळीची स्थापना 1 महिना आधी केली जाते. अनेक लोक याठिकाणी नवस सुद्धा बोलतात, असे पुजारी सांगतात.
यावर्षी ही होलिका 12 फेब्रुवारीला रचण्यात आली आहे. तेव्हापासून याठिकाणी पूजा सुरू आहे. आता येणाऱ्या 13 मार्चला म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाईल. त्यादिवशी होळीला नवीन कोरी साडी नेसवली जाते. धार्मिक विधी करून नैवद्य दाखवला जातो आणि सायंकाळच्या वेळी दहन करून याचा समारोप केला जातो, असे पुजारी सांगतात.





