advertisement

Mahashivratri 2026: 'बिन लग्नाचा' शिक्का कधी पुसला जाणार? लग्नगाठ जुळण्यासाठी महाशिवरात्रीचा महाउपाय

Last Updated:

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला काही खास उपाय केल्यास लग्न जुळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. या उपायांबद्दल आणि मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : दरवर्षी महाशिवरात्रीचा सण मोठ्या भक्तीने आणि उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीला केलेली पूजा, उपवास आणि मंत्रजापामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. विशेषतः लग्नकार्य आणि धनप्राप्तीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप गुणकारी मानला जातो. महाशिवरात्रीला काही खास उपाय केल्यास लग्न जुळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. या उपायांबद्दल आणि मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया.
कधी आहे महाशिवरात्री 2026?
यावर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:04 वाजता सुरू होईल आणि 16 फेब्रुवारीला संध्याकाळी 5:34 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शुभ योग आणि नक्षत्रांचा विशेष संयोग जुळून येत आहे.
महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व - महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो. ज्यांचे लग्न जमण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी मनसोक्त जोडीदार मिळवण्याची ही उत्तम संधी असते. तसेच, विवाहित लोकांसाठी हा दिवस संसारिक सुख वाढवणारा ठरतो.
advertisement
शुभ योग आणि पूजेची वेळ - महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 7:00 ते संध्याकाळी 7:48 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोगही या दिवशी पाहायला मिळेल. पूर्ण दिवस व्यतीपात योग असेल, तर रात्री पूजेसाठी निशिता काळ वेळ 11:52 ते 12:42 पर्यंत असेल. या दिवशी अभिजीत मुहूर्त आणि अमृतकाळात पूजा करणे खूप फायदेशीर मानले जात आहे.
advertisement
दोषांपासून मिळेल मुक्ती - ज्योतिषांनुसार, या दिवशी शिवलिंगावर 11 बेलपत्र अर्पण करा आणि त्यांचा गुळगुळीत भाग खालील बाजूस ठेवा. महादेवाला धोत्रा आणि भांग अर्पण केल्याने मनाला शांती मिळते. याशिवाय, सात शमीची फुले वाहिल्याने ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते आणि इच्छापूर्तीचे योग बनतात.
लग्नातील अडथळ्यांसाठी: लग्नाला उशीर होत असेल किंवा संसारात तणाव असेल, तर महाशिवरात्रीला शिव-पार्वतीची एकत्र पूजा करा. माता पार्वतीला शेंदूर, बांगड्या आणि टिकली अर्पण करा आणि भगवान शंकराचा पंचामृताने अभिषेक करा. आर्थिक अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी ऊसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करा आणि 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक स्थैर्य लाभते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2026: 'बिन लग्नाचा' शिक्का कधी पुसला जाणार? लग्नगाठ जुळण्यासाठी महाशिवरात्रीचा महाउपाय
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement