कधीकधी हे तीळ स्वतःच तयार होतात आणि काहीवेळा ते अदृश्यदेखील होतात. कधी कधी तुम्ही पाहिले असेल की काही महिलांच्या चेहऱ्यावरील तीळ त्यांच्या सौंदर्यातही भर घालतात.
प्रेमात सहसा अयशस्वी होतात या राशी, रिलेशनशिपवरून कायम असतात संभ्रमात
तुम्हाला माहिती आहे का, की हा तीळ आपल्याला आपल्या नशिबाची आणि भविष्याविषयीदेखील माहिती देतो. ज्योतिषशास्त्रानुसार महिलांच्या शरीरावर असलेल्या तिळांचे काही ना काही महत्त्व निश्चितच असते. यातून त्यांच्या वर्तनाची आणि त्यांच्या भविष्याचीही माहिती मिळते. चला जाणून घेऊया शरीराच्या अवयवांचे तीळ काय सूचित करतात.
advertisement
उजव्या गालावर तीळ
शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर असलेले तीळ नक्कीच काही ना काही संकेत देतात. अशा स्थितीत महिलांच्या उजव्या गालावर असणारा तीळ त्यांना आकर्षक बनवतो. तसेच, हे सूचित करते की, स्त्री कायमची श्रीमंत होणार आहे.
डाव्या गालावर तीळ
जर एखाद्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असेल तर असे मानले जाते की, तिला जगातील सर्व सुख-सुविधा प्राप्त होतात. यासोबतच अशा महिलांना खूप खर्चिक समजले जाते आणि या महिला आपले आयुष्य आरामात आणि आनंदाने घालवतात.
ओठाच्या वर तीळ
ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असते. त्या खूप आकर्षक दिसतात. तसेच असे मानले जाते की या महिला खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे हृदय सर्वांशी शेअर करत नाहीत. अशा महिलांना त्यांचे मन फक्त निवडक लोकांशी शेअर करायला आवडते.
कपाळावर तीळ
जर स्त्रीच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा महिला खूप भाग्यवान मानली जाते. असे म्हणतात की, या महिलांवर महालक्ष्मी नेहमी प्रसन्न असते. अशा महिला आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले स्थान प्राप्त करतात.
कुंडलीतील हे योग देतात शुभसंकेत,रातोरात व्हाल श्रीमंत! निर्धनही होतो धनवान
छातीवर तीळ
ज्या महिलांच्या छातीवर तीळ असते त्यांना खूप भाग्यवान मानले जाते. या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. असे म्हणतात की या महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. यासोबतच त्यांना त्यांच्या कामाच्या जोरावर नाव आणि प्रसिद्धी मिळते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
