TRENDING:

महाराष्ट्रातलं अनोखं गाव! घराच्या छतावर कधीच लावत नाही कवेलू, काय आहे कारण?

Last Updated:

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देवुरवाडा हे गाव देवाचा वाडा म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर या गावात कवेलू कधीच वापरल्या जात नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : पूर्वीच्या काळात सर्व ग्रामीण भागांत घराच्या छतावर कवेलू वापरण्यात येत होते. जास्तीत जास्त घरे ही कवेलू वापरून बनवली जात होती. आताही अनेक भागांत कवेलूची घरे आपल्याला बघायला मिळतात. पण, अमरावती जिल्ह्यातील एक असे गाव आहे ज्याठिकाणी कधीच कवेलू वापरले गेले नाही. आताही कुठेच कवेलू दिसत नाहीत. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देवुरवाडा हे गाव देवाचा वाडा म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर या गावात कवेलू कधीच वापरल्या जात नाहीत. ज्या वेळी घर बांधण्यासाठी काहीच मिळत नव्हतं त्यावेळी तेथील नागरिकांनी गवत आणि काठी वापरून घराचे छत तयार केले पण कधीही कौलारू घरे बांधली नाहीत.

advertisement

देऊरवाडा या गावात कौलारू घरे का दिसत नाहीत? याबाबत तेथील ग्रामस्थांशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की यामागे खूप मोठी आख्यायिका आहे. आमच्या गावात भगवान नृसिंह यांची स्वयंभू मूर्ती आहे. त्याचबरोबर गावातून वाहणारी पयोष्णी नदी सुद्धा या गावातील आख्यायिकेचा भाग आहे. भगवान विष्णू यांचे अवतार आहेत. मच्छ, कच्छ, वराह आणि नृसिंह. म्हणजेच विष्णूचा चौथा अवतार हे नृसिंह भगवान आहेत.

advertisement

ज्या घरात ही 3 कामं केली जातात, तिथे कधीच येत नाही आर्थिक तंगी, चाणक्यांनी सांगितलं श्रीमंतीचं रहस्य

पुढे ते सांगतात की, नृसिंह भगवान यांनी हिरण्यकशिपु याचा वध नखांनी केला. त्यानंतर नृसिंह भगवान यांच्य नखात दाह पेटला होता. तो दाह शांत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यानंतर ते पयोष्णी तीरावर आलेत. त्याठिकाणी असलेल्या करशुद्धीतीर्थावर आपली नखे पाण्यात बुडवली त्यानंतर त्यांच्या नखांतील दाह शांत झाला. तेव्हापासून नृसिंह भगवान या ठिकाणी स्थायिक झालेत. देऊरवाडा यागावात नृसिंह भगवान यांची स्वयंभू मूर्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

advertisement

देऊरवाडा या गावात कौलारू घरे का नाहीत? 

हिरण्यकशिपुचा वध केल्यानंतर नृसिंह भगवान हे देऊरवाडा गावात स्थायिक झालेत. लोकांची त्यांचावर अपार श्रद्धा निर्माण झाली. या गावातील सर्वच धर्माचे लोकं नृसिंह भगवान यांना मानतात. त्यामुळे नृसिंह भगवान यांच्या सबंधित कोणतीही बाब मोठ्या श्रध्देने पाळतात. कवेलूचा आकार हा नृसिंह भगवान यांच्या नखांसारखा असल्याने या गावात कोणीच कवेलू वापरत नाही. काही लोकांनी वापरण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांना चमत्कार घडून आलेत. त्यामुळे त्यानंतर कोणीही गावात कौलारू घरे बांधली नाहीत, अशी माहिती श्रीकृष्ण गायगोले यांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

मराठी बातम्या/अध्यात्म/
महाराष्ट्रातलं अनोखं गाव! घराच्या छतावर कधीच लावत नाही कवेलू, काय आहे कारण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल