अयोध्या, 14 नोव्हेंबर : हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला भाऊबीज सण साजरा केला जातो. हा दिवस यमद्वितीया म्हणूनही ओळखला जातो. रक्षाबंधन आणि भाऊबीज हे दोन्ही सण बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानले जातात.
भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ एक छानशी भेट बहिणीला ओवाळणी म्हणून देतो. परंतु यंदा भाऊबीजेच्या दिवशी भावाला नेमकं कधी ओवाळावं याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे आज आपण भाऊबीजेचा नेमका मुहूर्त पाहणार आहोत.
advertisement
बहिणींनो, यंदा घेऊ नका, तुम्ही स्वतः 'हे' गिफ्ट द्या; भाऊ होईल खुश!
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून मनगटावर रक्षासूत्र बांधते. यंदा कार्तिक मासातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजून 36 मिनिटांपासून 15 नोव्हेंबर रोजी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भाऊबीज दुपारी साजरी केली जाते. त्यामुळे यंदा 14 नोव्हेंबरला दुपारी बहीण भावाला ओवाळू शकते.
हिरा परवडणार नाही, मग 'हा' रत्न करा खरेदी! भाग्याचा दरवाजा उघडेल
खरंतर प्रतिपदा तिथीमुळे 14 नोव्हेंबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत भाऊबीज साजरी करता येईल. परंतु लक्षात घ्या, भावाला ओवाळून टिळा लावण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपासून 3 वाजून 19 मिनिटांपर्यंत आहे. शिवाय ओवाळणीदरम्यान भावाचं तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेत असावं. तर, बहिणीचं तोंड पूर्व किंवा ईशान्य दिशेत असायला हवं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g