अयोध्या : याचवर्षी 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील भव्य आणि दिव्य अशा राम मंदिरात रामलला विराजमान झाले. यानंतर आता अयोध्येत दररोज लाखो भाविक रामललाचे दर्शन घेत आहेत. संपूर्ण देशच नव्हे तर जगभरातील भाविक अयोध्येमध्ये रामललाचे दर्शन घेत आहेत. रामललाच्या आगमनाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
धार्मिक नगरी अयोध्येत आता लवकरच विविध राज्यांचे अतिथी भवन तयार होणार आहेत. देशातील सर्व राज्ये अयोध्येत आपले अतिथी भवन तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे जमिनीची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य आहे, ज्या राज्याने अयोध्येत जमिनीची नोंदणी केली आहे आणि लवकरच उत्तराखंड राज्याचे स्वतःचे अतिथी भवन अयोध्येत तयार होणार आहे.
advertisement
यातच आता अयोध्या आणि महाराष्ट्राला जोडणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तराखंडनंतर आता अयोध्येतही लवकरच महाराष्ट्र अतिथी भवन (गेस्ट हाऊस) तयार होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अयोध्येत होते. यावेळी त्यांनी रामललाचे दर्शन घेतले आणि रामललाचे आशिर्वाद मागितले. यावेळी त्यांनी सांगितले की, आज अयोध्या येथे येऊन रामललाच्या दर्शनानंतर माझे जीवन धन्य झाले आहे. तसेच आता लवकरच अयोध्येतही महाराष्ट्राचे अतिथी भवन तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्व चिंता मिटतील, अन् आर्थिक फायदाही होईल, फक्त शनि जयंतीला करा या स्तोत्राचं पठण
22 जानेवारीचा तो ऐतिहासिक दिवस -
दरम्यान, याचवर्षी 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य अशा राम मंदिरात रामलला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक सोहळ्याचे यजमान होते. या सोहळ्याला देशातील प्रमुख साधू संतांसह देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती. रामलला अयोध्येतील आपल्या मंदिरात विराजमान झाल्यानंतर कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.