नोकरी मिळणार, व्यापारही वाढणार, 4 दिवसांत 3 मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन, या 6 राशीच्या लोकांना मोठा फायदा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना महत्त्वाचा मानला जात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 01 जूनला मंगळ ग्रह मेष राशीत जाणार आहे. मग 12 जून रोजी शुक्र ग्रह मिथुन राथीत जाणार आहे.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : वैदिक ज्योतिष शास्त्रात राशी परिवर्तन ही मोठी घटना आहे. याचा पूर्ण प्रभाव हा 9 ग्रह आणि 12 राशीच्या लोकांवर पाहायला मिळतो. आता जून महिना सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक मोठे ग्रह हे राशी परिवर्तन करणार आहेत.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जूनमध्ये शुक्र, बुध, मंगळ, सूर्य आणि शनि राशी परिवर्तन करणार आहेत. याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम पाहायला मिळेल. अयोध्येतील ज्योतिष पंडित कल्कि राम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना महत्त्वाचा मानला जात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 01 जूनला मंगळ ग्रह मेष राशीत जाणार आहे. मग 12 जून रोजी शुक्र ग्रह मिथुन राथीत जाणार आहे. यानंतर 14 जूनला बुध ग्रह मिथुन राशीत आणि 15 जूनला सूर्य ग्रह मिथुन राशीत जाणार आहे. म्हणजे 4 दिवसाच्या आतच मिथुन राशीत 3 ग्रह जाणार आहेत. या नंतर महिन्याच्या शेवटी न्यायदेवता आपल्या स्वत:च्या राशीत वक्री होतील. या सर्व परिस्थितीमुळे 6 राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
मेष राशी : अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होत असल्याने या राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. जून महिन्यात या राशीच्या लोकांचे राहिलेली कामे पूर्ण होती. तुमचा कामाचे क्षेत्र वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच चांगल्या गोष्टी घडण्याचा योग आहे. या दरम्यान, जातकामध्ये आत्मविश्वास वाढेल.
तुम्हीही तुळशीची माळसोबत घालतात रुद्राक्ष?, आताच व्हा सावधान! महत्त्वाची माहिती..
वृषभ राशि : वृषभ राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांना पगारात वाढ आणि प्रमोशनचा योग आहे. या दरम्यान, धनलाभाचा योग आहे. प्रभावशाली लोकांशी ओळख होईल. भेट होईल. नशिबाची साथ मिळेल. तसेच राहिलेली कामंही पूर्ण होतील.
advertisement
सिंह राशि : सिंह राशीच्या जातकांना जूनचा महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो. या दरम्यान, उत्पन्नात वाढ होईल आणि कमाईच्या नवीन स्त्रोत वाढतील. तसेच समाजात मान सन्मान वाढेल आणि यश ही मिळेल.
कन्या राशी : कन्या राशीच्या जातकांच्या जीवनात लाभ होईल. नोकरीचा शोध संपेल. पगारात वाढ होईल. वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
advertisement
दोन दिवसांनी खुलणार या 3 राशीच्या लोकांचं नशिब, बुध ग्रहाचे राशी परिवर्तन, तयार होणार मोठा योग
तूळ राशी : तूळ राशीच्या लोकांसाठी ही वेळ चांगली आहे. आरोग्याचे प्रश्न दूर होतील. धन लाभाच्या अनेक संधी मिळतील. कार्यक्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांची साथ मिळेल.
धनु राशी : धनु राशीच्या जातकांना व्यापारात मोठा फायदा होईल. तसेच मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. तसेच या दरम्यान, नशिबाची साथ मिळेल त्यामुळे मन महिनाभर प्रसन्न राहील.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
May 30, 2024 9:14 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
नोकरी मिळणार, व्यापारही वाढणार, 4 दिवसांत 3 मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन, या 6 राशीच्या लोकांना मोठा फायदा