Vanita Kharat Home: हटके नेमप्लेट, मोजकंच फर्निचर अन् इंटिरियर; हास्यजत्रा फेम वनिता खरातचं सुटसुटीत घर पाहिलंत का?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
१० बाय १० च्या घरातून थेट अलिशान बिल्डिंगमध्येच 23व्या मजल्यावर अभिनेत्री वनिता खरात हिने नवं घर खरेदी केलं आहे. नेमकं अभिनेत्रीचं हे नवं घर कशा पद्धतीने दिसतंय, याची झलक आपण फोटोच्या माध्यमातून पाहणार आहोत. वनिताने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच एक व्हिडिओ शेअर केली होती.
प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या घराबद्दल फार उत्सुकता असते, त्याच्या घरातील इंटिरियर, शिवाय त्याची आवडती वॉल (भिंत) अशा अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना फार आपुलकी असते. अलीकडेच मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात हिने अलिशान बिल्डिंगमध्ये नवं घर खरेदी केल्याची माहिती तिने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
advertisement
१० बाय १० च्या घरातून थेट अलिशान बिल्डिंगमध्येच वनिताने नवं घर खरेदी केलं आहे. काही तासांपूर्वीच वनिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तिने तिच्या घरातील प्रत्येक कोपरा, भिंत कशा पद्धतीने सजवला आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने कशा पद्धतीने तिचं घर सजवलंय जाणून घेऊया...
advertisement
वनिताने इन्स्टाग्रामवर होम टूरचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "घर घेतल्यावर कदाचित घ्यायच्या आधीच माझं ठरलं होत की माझं घर कसं दिसेल कसं असेल, अगदी तसच्या तसं किंबहुना त्याहून खूप सुंदर घर सजवलंस तू विनायक. मी तुझ्या हातात मोकळा “फ्लॅट” दिला होता तू त्याचं प्रचंड सुंदर “घर” तयार केलंस, विनायक तुला प्रचंड घट्ट मिठी आणि आयुष्यभरासाठी प्रेम"
advertisement
अभिनेत्री वनिता खरातच्या घराची टूर सुरू होते ती, तिच्या घराच्या नेमप्लेट पासून... साधी पण सिंपल आणि आकर्षक अशा नेमप्लेटने सर्वांचेच लक्ष वेधले. साधी सिंपल नेमप्लेट मात्र खूपच एलिगेंट दिसते. त्यावर वनिता खरात, 2302 A असं लिहिलेलं दिसतंय. शिवाय, अभिनेत्रीकडे पुस्तकांचा खजिनाही पाहायला मिळतोय. घराच्या एका कोपऱ्यात तिने पुस्तकांसाठी खास रॅक उभारलाय.
advertisement
advertisement
advertisement







