सर्व चिंता मिटतील, अन् आर्थिक फायदाही होईल, फक्त शनि जयंतीला करा या स्तोत्राचं पठण
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत सांगितले की, 6 जूनला शनि जयंती साजरी केली जाईल.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : हिंदू पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला शनि जयंतीचा सण साजरा केला जातो. यावेळी हा सण येत्या 6 तारखेला साजरा केला जाणार आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शनिदेवाची पूजा आराधना केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवासही केला जातो.
या दिवशी शनि देवाची उपासना करायला सांगितली जाते. यामुळे आयुष्यात येत असलेल्या सर्व समस्यांपासून सुटका होते. तसेच सुख समृद्धीची प्राप्ती होते. जर तुम्हालाहरी शनिदेवाची कृपा प्राप्त करायची आहे, तर शनि जयंतीच्या दिवशी विशेष पूजा आराधना करायला हवी. शनिदेवाला त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य द्यायला हवा. तसेच शनिस्त्रोताचा पाठ करायला हवा.
advertisement
नोकरी मिळणार, व्यापारही वाढणार, 4 दिवसांत 3 मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन, या 6 राशीच्या लोकांना मोठा फायदा
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत सांगितले की, 6 जूनला शनि जयंती साजरी केली जाईल. तसेच मान्यतेनुसार, यादिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जातक अनेक प्रकारचे उपाय करतात. शनिदेव ज्याच्यावर प्रसन्न होतात, त्याला रंकापासून राजा बनवतात. शनिदेव हे कर्म फळाचे दाता मानले जातात. त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी जर तुम्ही शनि स्त्रोताचे पठण विधीनुसार केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्या सुटतील.
advertisement
शनि स्तोत्र -
नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च।नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।।
नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च।नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते।।
नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम:।नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते।।
नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम:।नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने।।
advertisement
नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते।सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च।।
अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते।नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते।।
तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च।नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम:।।
ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे।तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्।।
देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा:।त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत:।।
प्रसाद कुरु मे सौरे वारदो भव भास्करे।एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल:।।
advertisement
शनि देव की जय! शनि महाराज की जय! जय जय शनि देव!
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
May 31, 2024 5:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
सर्व चिंता मिटतील, अन् आर्थिक फायदाही होईल, फक्त शनि जयंतीला करा या स्तोत्राचं पठण