TRENDING:

Mahashivratri 2026: बेलपत्राशिवाय महाशिवरात्रीची पूजा कशी होईल; त्यासाठी आजच कराव्या लागतील या गोष्टी, धार्मिक नियम

Last Updated:

Mahashivratri 2026: शिवलिंगावर जलाभिषेकासोबतच बेलपत्र अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु शास्त्र आणि पुराणांमध्ये बेलपत्र तोडण्याबाबत काही खास नियम सांगितले आहेत. बेलपत्र तोडण्याबाबत कोणते नियम आहेत आणि त्यांचे पालन करणे का गरजेचे मानले जाते याबाबत जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी माघ महिना शंभु महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त व्रत ठेवून विधिपूर्वक भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. शिवलिंगावर जलाभिषेकासोबतच बेलपत्र अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु शास्त्र आणि पुराणांमध्ये बेलपत्र तोडण्याबाबत काही खास नियम सांगितले आहेत. बेलपत्र तोडण्याबाबत कोणते नियम आहेत आणि त्यांचे पालन करणे का गरजेचे मानले जाते याबाबत जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

पूजा विधीत बेलपत्राचे महत्त्व - महादेवाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये बेलपत्र प्रमुख आहे. याला बिल्वपत्र असेही म्हटले जाते. शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा आणि पांढरी फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्राची तीन पाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली जातात. महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्याने शिवाची कृपा प्राप्त होते.

बेलपत्र कधी तोडावे -

advertisement

शास्त्रानुसार सोमवार आणि चतुर्दशी तिथीला बेलपत्र तोडू नये. महाशिवरात्री स्वतः चतुर्दशीला येते, म्हणून या दिवशी बेलपत्र तोडणे वर्जित मानले गेले आहे. महाशिवरात्री दिवशी बेलपत्र एक दिवस आधीच तोडून ठेवून द्यावे. महाशिवरात्री दिवशी बेलपत्र तोडल्यास शंकराची अवकृपा होऊ शकते. धार्मिक मान्यतेनुसार नियमांचे पालन करून बेलपत्र अर्पण केल्यास महादेवाची विशेष कृपा मिळते.

advertisement

सोमवार शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे, परंतु याच दिवशी बेलपत्र तोडणे निषिद्ध सांगितले आहे. असे मानले जाते की सोमवारच्या दिवशी बेलवृक्षात माता पार्वतीचा वास असतो. अशा वेळी या दिवशी पाने तोडणे हा अनादर मानला जातो.

रविवार आणि द्वादशी तिथीचा नियम - स्कंद पुराणात असा उल्लेख मिळतो की रविवार आणि दोन्ही पक्षांच्या द्वादशी तिथीला देखील बेलपत्र तोडणे वर्जित आहे. मात्र, या दिवशी बेलवृक्षाची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. असे केल्याने धन-समृद्धीत वाढ होते.

advertisement

कोणत्याही महिन्यातील चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या आणि संक्रांतीच्या तिथींना बेलपत्र तोडू नये. याशिवाय जेव्हा एक तिथी संपून दुसरी सुरू होत असते, त्या संधिकालमध्ये सुद्धा बेलपत्र तोडणे योग्य मानले जात नाही. प्रदोष व्रत, शिवरात्री आणि सोमवारच्या दिवशी देखील बेलपत्र तोडणे टाळावे.

बेलपत्र तोडताना या गोष्टी लक्षात ठेवा -

बेलपत्र तोडताना झाडाची संपूर्ण फांदी कधीही तोडू नका. एक-एक पान तोडणे शुभ मानले जाते. बेलवृक्षाची पाने तोडण्यापूर्वी भगवान शिव यांचे स्मरण जरूर करावे. बेलपत्र घेतल्यानंतर वृक्षाला नमस्कार अवश्य करावा. शंकराला किमान एक बेलपत्र अर्पण केले जाऊ शकते. शक्य असल्यास 11 किंवा 21 च्या संख्येतही पाने वाहता येतात.

advertisement

सुखाची लाईफ..! बुध-गुरुचा नवपंचम योग 5 राशींना लकी, आनंदाला उरणार नाही पारावार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

शिवलिंगावर नेहमी तीन पाने असलेले बेलपत्रच अर्पण करावे. जर 5 पाने असलेले बेलपत्र मिळाले तर ते अतिशय उत्तम मानले जाते. शिवलिंगावर स्वच्छ, न फाटलेली आणि डाग नसलेली बेलपत्रेच वाहावीत. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे धुवून स्वच्छ करून घ्यावे. नेहमी ताज्या तोडलेल्या बेलपत्रांचाच पूजेत उपयोग करण्याचा प्रयत्न करा.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Mahashivratri 2026: बेलपत्राशिवाय महाशिवरात्रीची पूजा कशी होईल; त्यासाठी आजच कराव्या लागतील या गोष्टी, धार्मिक नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल