जवळपास आरसा प्रत्येकाच्या घरात असतो, पण योग्य जागी कसा ठेवायचा हे खूप कमी लोकांना माहिती असते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील आरसा अनुकूल दिशेला असेल तर व्यक्तीला सौभाग्य मिळते आणि जर दिशा प्रतिकूल असेल तर ते घर गरिबीने भरते. ज्योतिषी आणि वास्तुशास्त्र सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांच्याकडून जाणून घेऊया, आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये आरसा दक्षिण दिशेला ठेवला तर त्याचे काय परिणाम होतात.
advertisement
घरगुती कलह निर्माण होतात - जर तुमच्या घरात दररोज अशांतता किंवा घरगुती वाद होत असतील तर त्याचे प्रमुख कारण दक्षिण दिशेला लावलेला आरसा असू शकतो.
यामुळे तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला आरसा असेल तर तो लवकरात लवकर काढून त्याची दिशा बदला. या आरशाच्या अशुभ प्रभावामुळे आपण आणखी गरीब होऊ शकता. म्हणून, आरसा योग्य दिशेला ठेवा जेणेकरून तुमच्या प्रगतीच्या संधींमध्ये अडथळा येणार नाही.
नकारात्मक उर्जेला आमंत्रण - दक्षिण दिशेला लावलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. याशिवाय, या ठिकाणी आरसा ठेवल्याने घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होते आणि कुटुंबामध्ये भांडणे आणि वाद होतात. या दिशेला लावलेला आरसा तुमच्या घरात तणावाची परिस्थिती निर्माण करू शकतो.
संघर्षाची सवय झाली होती! या मूलांकाचे आता भाग्य उजळणार, खुशखबर-आर्थिक लाभ
तुमचे करिअर खराब - घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आरसा लावला असेल तर तो तिथून काढा, कारण त्यामुळे तुमचे करिअर आणि व्यवसाय खराब होऊ शकतो. यासोबतच, आरशाची ही स्थिती तुमच्या घरातील समृद्धी नष्ट करते आणि तुमचे अनेक गोष्टीत नुकसान करू शकते.
जर आरसा दक्षिण दिशेला असेल तर काय करावे? तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये दक्षिणेकडे तोंड करून आरसा लावला असेल तर तो ताबडतोब काढून दुसऱ्या दिशेला लावा. काही कारणास्तव आरसा काढता येत नसेल तर तो झाकून ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.
राशी बदलून शनिचा उदय! या राशींच्या खूप काही पथ्यावर पडणार, भाग्य उजळण्याचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
