TRENDING:

Astro Tips: व्यवसाय-दुकानातून वाढतो नफा! कामाच्या ठिकाणी लकी मानल्या जातात या गोष्टी

Last Updated:

Astro Tips: घराची आर्थिक स्थिती व कुटुंबातल्या सर्वांच्या कल्याणासाठी वास्तुशास्त्राचे नियम उपयुक्त ठरतात. शिवाय कामाच्या ठिकाणीही काही गोष्टींचं पालन केल्यास त्याचा फायदा होतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :   ज्योतिषशास्त्राला आपल्याकडे महत्त्वाचं स्थान आहे. फक्त घराच्या रचनेबद्दलच नाही, तर इतर गोष्टींबाबतही वास्तुशास्त्रात अनेक सल्ले देण्यात येतात. अनेकांची वास्तुशास्त्रावर प्रचंड श्रद्धा असते. वास्तुशास्त्रानुसार, काही नियमांचं पालन केल्यास आयुष्यात सुख व शांती नांदते, तसंच आर्थिक स्थितीही सुधारते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी, असं तुम्हाला वाटत असेल, घरात समृद्धी व आर्थिक भरभराट हवी असेल तर त्यासाठी काही नियम पाळावे लागतात. घराची आर्थिक स्थिती व कुटुंबातल्या सर्वांच्या कल्याणासाठी वास्तुशास्त्राचे नियम उपयुक्त ठरतात. शिवाय कामाच्या ठिकाणीही काही गोष्टींचं पालन केल्यास त्याचा फायदा होतो.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

अनेकांना ऑफिसमध्ये काही ना काही अडचणी असतात. वास्तुशास्त्रातले काही उपाय तुमचं कामाचं ठिकाण किंवा ऑफिसमधल्या समस्या दूर करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या ऑफिसच्या टेबलावर ठेवल्यास सकारात्मकता येते आणि प्रगतीची शक्यता निर्माण होते.

क्रिस्टल धातू -

वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर क्रिस्टल धातू ईशान्य दिशेला ठेवणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे रखडलेली प्रलंबित कामं पूर्ण होतात व यश मिळतं. यासोबतच आर्थिक स्थितीही स्थिर राहते.

advertisement

नाण्यांनी भरलेलं जहाज -

ऑफिसच्या डेस्कवर नाण्यांनी भरलेलं जहाज ठेवणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे प्रगती होते आणि करिअरमध्ये वृद्धी होते, असं म्हटलं जातं. यामुळे सभोवताली सकारात्मकता राहते.

 बांबूचं रोप -

वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर बांबूचं रोप ठेवणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे डेस्कवर सकारात्मकता टिकून राहते आणि नकारात्मकता दूर राहते. तुमच्या आजूबाजूचं वातावरणही चांगलं राहतं.

advertisement

Vastu Tips: दक्षिणमुखी घर का असू नये? वास्तुशास्त्रात यावर काय सांगितलंय पहा

गणपतीची मूर्ती -

वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर गणपतीची मूर्ती ठेवल्याने खूप फायदा होतो. यामुळे नोकरीमध्ये कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि करिअरमध्येही प्रगती होते. ही मूर्ती तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू शकता.

भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती -

advertisement

तुम्ही तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर भगवान गौतम बुद्ध यांची एक मूर्ती जरूर ठेवावी. यामुळे तणाव दूर होतो आणि मानसिक शांतता कायम राहते. कामात लक्ष लागतं व एकाग्रता वाढते, असं म्हटलं जातं.

पैशांची तंगी, प्रगती खुंटलीय! मोबाईल नंबरमधील हा अंक घालतोय का घोळ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Astro Tips: व्यवसाय-दुकानातून वाढतो नफा! कामाच्या ठिकाणी लकी मानल्या जातात या गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल