TRENDING:

आत्तापर्यंत कुणीच सांगितलं नसेल! रुद्राक्ष बदलू शकतो तुमचं नशीब, फक्त 'या' आहेत अटी

Last Updated:

रुद्राक्षाचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. एकमुखी रुद्राक्ष मानसिक शांती देतो आणि वास्तुदोष दूर करतो. 1 ते 21 मुखी रुद्राक्ष असतात आणि ते वेगवेगळ्या ग्रहांसाठी धारण केले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंदू धर्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. मानले जाते की, रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांती, व्यवसाय आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो. विशेषतः एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांतता, आरोग्य सुधारते तसेच वास्तुदोष आणि ग्रहदोष देखील दूर होतात.
Rudraksha,
Rudraksha,
advertisement

मुंबईतील रुद्रालाइफ संस्थेने जामनगरमध्ये दुर्मिळ रुद्राक्षांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले. या संस्थेने आतापर्यंत संपूर्ण जगभरात 1100 पेक्षा जास्त यशस्वी रुद्राक्ष प्रदर्शनं आयोजित केली आहेत. या प्रदर्शनात 1 मुखी ते 14 मुखी सिद्धमाला आणि 21 मुखी रुद्राक्षाचे दर्शन घडवण्यात आले. रुद्रालाइफच्या वरिष्ठ तज्ज्ञांनुसार, 1 मुखी ते 21 मुखी पर्यंत रुद्राक्ष असतात, आणि प्रत्येक मुख ग्रहानुसार वेगळा प्रभाव दाखवतो.

advertisement

रुद्राक्ष धारण केल्याने काय होते?

रुद्राक्ष घातल्याने विचारशक्ती सुधारते आणि मानसिक स्थैर्य मिळते. ग्रहदोष निवारणासाठी योग्य मुखी रुद्राक्ष घालण्याचा सल्ला दिला जातो.

  • सूर्य ग्रहासाठी : 1 मुखी, 12 मुखी आणि 21 मुखी रुद्राक्ष धारण करावा.
  • चंद्र ग्रहासाठी : 2 मुखी आणि 20 मुखी रुद्राक्ष धारण करावा.
  • गुरु ग्रहासाठी : 5 मुखी आणि 15 मुखी रुद्राक्ष उपयुक्त ठरतो.
  • advertisement

  • राहू ग्रहासाठी : 8 मुखी आणि 10 मुखी रुद्राक्ष धारण करावा.
  • शुक्र ग्रहासाठी : 6 मुखी, 13 मुखी आणि 21 मुखी रुद्राक्ष घालावा.
  • केतू ग्रहासाठी : 9 मुखी आणि 10 मुखी रुद्राक्ष फायदेशीर मानला जातो.
  • शनी ग्रहासाठी : 7 मुखी, 14 मुखी आणि 17 मुखी रुद्राक्ष उपयुक्त आहे.
  • मंगळ ग्रहासाठी : 3 मुखी, 11 मुखी आणि 18 मुखी रुद्राक्ष धारण करावा.
  • advertisement

रुद्राक्ष धारण करण्याची योग्य पद्धत

रुद्राक्ष जन्मतारखेच्या आधारे आणि अनुभवी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार घालावा. तो घालण्यापूर्वी पूजा करून मंत्रांनी शुद्ध करणे आवश्यक असते. बहुतेक रुद्राक्ष नेपाळमधून येतात, तर जपमाळांसाठी लागणारे रुद्राक्ष इंडोनेशियामधून आणले जातात. रुद्राक्षाची किंमत 50 रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत असते, आणि त्याची किंमत त्याच्या कार्यक्षमतेनुसार ठरवली जाते. रुद्राक्ष धारण केल्याने ग्रहांचे नकारात्मक परिणाम कमी होतात, मानसिक स्थैर्य मिळते आणि जीवनात सकारात्मकता येते. मात्र, योग्य मार्गदर्शनाशिवाय आणि पूजेविना तो घालू नये.

advertisement

हे ही वाचा : महिलांच्या शरीरावरील तीळ आणि त्याचे महत्त्व! प्रत्येक तिळामागचं रहस्य काय असतं, त्याचा अर्थ काय? 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

हे ही वाचा : गायीच्या शेपटीच्या केसांपासून पितृ दोष-कालसर्प दोषातून मिळते मुक्ती! जाणून घ्या, त्याचे इतरही फायदे...

मराठी बातम्या/अध्यात्म/
आत्तापर्यंत कुणीच सांगितलं नसेल! रुद्राक्ष बदलू शकतो तुमचं नशीब, फक्त 'या' आहेत अटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल