महिलांच्या शरीरावरील तीळ आणि त्याचे महत्त्व! प्रत्येक तिळामागचं रहस्य काय असतं, त्याचा अर्थ काय?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
सामुद्रिक शास्त्रानुसार, महिलांच्या शरीरावरील तीळ त्यांच्या भविष्याबद्दल आणि स्वभावाबद्दल सांगतात. काही तीळ शुभ असतात तर काही अशुभ.
समुद्रशास्त्रानुसार, महिलांच्या शरीरावरील वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तीळांचे वेगवेगळे अर्थ असतात. काही तीळ शुभ असतात, तर काहींचे परिणाम प्रतिकूलही असू शकतात. याशिवाय, शरीरावरील तीळ महिलांच्या सौंदर्यातही भर घालतात. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असल्यास त्याचा काय अर्थ होतो? हे चला जाणून घेऊया...
1) नाकावरील तीळ - नशिबाने यशस्वी होणारी महिला : जर एखाद्या महिलेच्या नाकावर तीळ असेल, तर ती खूप भाग्यवान मानली जाते. अशा महिला त्यांच्या नशिबाच्या जोरावर जीवनात मोठे यश मिळवतात.
2) हाताच्या तळव्यावर तीळ - धनप्राप्तीची शक्यता : ज्या महिलांच्या हाताच्या तळव्यावर तीळ असतो, त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. काही काळानंतर त्या आर्थिकदृष्ट्या स्थिर होतात आणि त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता राहत नाही.
advertisement
3) कपाळावरील तीळ - सुखी संसाराचे संकेत : ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो, त्या अत्यंत नशिबवान असतात. त्यांना सासरच्या घरातही खूप प्रेम आणि सन्मान मिळतो आणि त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
4) गालावर तीळ - संपन्न आणि ऐश्वर्यसंपन्न जीवन : ज्या महिलांच्या गालावर तीळ असतो, त्या खूप समृद्ध आणि ऐश्वर्यसंपन्न असतात. त्यांचे जीवन सर्व सुख-सुविधांनी भरलेले असते.
advertisement
5) कानावर तीळ - विनम्र स्वभावाची ओळख : ज्या महिलांच्या कानावर तीळ असतो, त्या अतिशय साध्या आणि विनम्र स्वभावाच्या असतात. अशा महिला आपल्या पती, वडील आणि सासरच्यांचा नेहमीच आदर करणाऱ्या असतात.
6) ओठांवर तीळ - काटकसरी स्वभाव : ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असतो, त्या स्वभावाने फारच काटकसरी असतात. त्या पैशांचा फार विचारपूर्वक वापर करतात आणि उगाचच खर्च करत नाहीत.
advertisement
7) पायांवर तीळ - लक्ष्मीस्वरूप स्त्री : ज्या महिलांच्या पायांवर तीळ असतो, त्या साक्षात देवी लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जातात. त्या जिथे जातात, तिथे धन आणि समृद्धी नक्कीच येते.
8) छातीवर तीळ - सुसंस्कारित अपत्यप्राप्ती : ज्या महिलांच्या छातीवर तीळ असतो, त्यांना सुसंस्कारित आणि आज्ञाधारक मुले मिळतात. त्यांची मुले त्यांचं ऐकणारी आणि त्यांना मान देणारी असतात.
advertisement
9) हातावर तीळ - उत्तम स्वयंपाक करण्याची कला : ज्या महिलांच्या हातावर तीळ असतो, त्या स्वयंपाकात पारंगत असतात. त्यांचे अन्न खूपच चविष्ट असते, जणू काही अन्नपूर्णा देवीचा आशीर्वादच त्यांच्या हाताला असतो.
10) पाठीवर तीळ - आक्रमक स्वभाव : ज्या महिलांच्या पाठीवर तीळ असतो, त्या स्वभावाने थोड्या आक्रमक असतात. त्यांचा राग कधी कधी नियंत्रणाबाहेर जातो आणि त्या फारच तडफदार स्वभावाच्या असतात.
advertisement
समुद्रशास्त्रानुसार, शरीरावरील तीळ केवळ सौंदर्य वाढवण्यास मदत करत नाहीत, तर त्यामागे विशिष्ट संकेत आणि लक्षणेही असतात. तीळाच्या जागेनुसार महिलांचा स्वभाव, त्यांचे नशीब आणि भविष्यातील शक्यता ओळखता येतात.
हे ही वाचा : Vastu Shastra : घरात समृद्धी हवी आहे? चुकूनही ठेवू नका उत्तर दिशेला 'या' वस्तू, अन्यथा येईल मोठं आर्थिक संकट
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2025 11:16 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
महिलांच्या शरीरावरील तीळ आणि त्याचे महत्त्व! प्रत्येक तिळामागचं रहस्य काय असतं, त्याचा अर्थ काय?








