TRENDING:

2026 मध्ये कधी साजरी केली जाणार शनी जयंती, का असते खास? आत्ताच नोट करा अचूक तारीख आणि महत्व

Last Updated:

ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफलदाता' मानले जाते. शनी देवाच्या जन्मोत्सवाला 'शनी जयंती' असे म्हटले जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shani Jayanti 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाला 'न्यायदेवता' आणि 'कर्मफलदाता' मानले जाते. शनी देवाच्या जन्मोत्सवाला 'शनी जयंती' असे म्हटले जाते. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. 2026 वर्ष शनी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यावर्षी शनी जयंती एका दुर्मिळ योगात येत आहे. 2026 मध्ये शनी जयंती नेमकी कोणत्या तारखेला साजरी केली जाणार आहे आणि त्याच महत्व काय हे जाऊन घेऊ.
News18
News18
advertisement

शनी जयंती 2026: अचूक तारीख आणि तिथी

2026 मध्ये शनी जयंतीची तारीख आणि तिथीबाबत पंचांगानुसार शनिवार, 16 मे 2026 ही आहे. 16 मे 2026 रोजी सकाळी 05:11 वाजता अमावास्येची सुरूवात होईल. तर 17 मे 2026 रोजी मध्यरात्री 01:30 वाजता अमावास्येची समाप्ती होईल. यावर्षी शनी जयंती शनिवारी आली आहे. शनी देवाचा जन्मवार शनिवार आहे आणि त्यांची जयंतीही शनिवारीच आल्याने याला 'शनी अमावास्या' आणि 'महा-योग' मानले जात आहे. असा योग साधकांसाठी अत्यंत फलदायी असतो.

advertisement

शनी जयंतीचे महत्त्व आणि 'खास' कारण

शनी जयंतीचा दिवस शनी दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यावर्षीचे महत्त्व वाढण्याची काही मुख्य कारणे म्हणजे 2026 मध्ये शनी देव मीन राशीत विराजमान असतील. यामुळे मीन, कुंभ आणि मेष राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल, तर सिंह आणि धनु राशींवर शनीची ढैय्या असेल. या राशीच्या लोकांसाठी शनी जयंतीची पूजा त्रासातून मुक्ती देणारी ठरेल. शनी देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. या दिवशी केलेली भक्ती आणि दानधर्म व्यक्तीच्या जुन्या कर्मांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करतात. या दिवशी शनी देवाला प्रसन्न केल्याने संकट टळते असे मानले जाते. या दिवशी शनी देवाची मनोभावे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असेही मानले जाते.

advertisement

पूजा विधी आणि प्रभावी उपाय

शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीला काही खास उपाय आवर्जून करावेत. शनी मंदिरात जाऊन शनी देवाच्या मूर्तीवर मोहरीच्या तेलाचा अभिषेक करावा. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष आणि शनीदोष दोन्ही दूर होतात. या दिवशी काळे तीळ, काळे कपडे, लोखंडी वस्तू किंवा छत्री गरीब व्यक्तीला दान करावी. आणि "ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः" या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. तसेच हनुमान चालीसा किंवा शनी चालिसा वाचणे अत्यंत शुभ मानले जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशीही आरोग्य सेवा, रक्तदान आणि अवयवदानासाठी काम करणारे अमित, Video पाहुन कराल कौतुक
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
2026 मध्ये कधी साजरी केली जाणार शनी जयंती, का असते खास? आत्ताच नोट करा अचूक तारीख आणि महत्व
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल