TRENDING:

Shani Pradosh Vrat 2025: सिद्धी योगात आज शनिप्रदोष व्रत! शंभूदेवाच्या पूजेचे महत्त्व, विधी-शुभ मुहूर्त, मंत्र पाहा

Last Updated:

Shani Pradosh Vrat 2025: भगवान शिव आणि शनिदेव या दोघांची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सिद्धी योगासोबतच कुंभ राशीत सूर्य, शुक्र आणि बुध एकत्र आल्याने बुधादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मी नारायण असे शुभ योग तयार झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रदोष व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. आज 14 फेब्रुवारी 2026 शनिवारी शनि प्रदोष व्रत पाळले जात आहे. हिंदू धर्मात भगवान शिव आणि शनिदेव या दोघांची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सिद्धी योगासोबतच कुंभ राशीत सूर्य, शुक्र आणि बुध एकत्र आल्याने बुधादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मी नारायण असे शुभ योग तयार झाले आहेत.
News18
News18
advertisement

शनि प्रदोष व्रताचे महत्त्व - प्रदोष व्रत भगवान शिव यांना समर्पित आहे. जेव्हा हे व्रत शनिवारी येते, तेव्हा त्याला शनि प्रदोष म्हणतात. शनिदेव हे महादेवाचे परम भक्त असल्याने या दिवशी केलेली पूजा शनि दोषांपासून (साडेसाती, अडीचकी) मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम मानली जाते. प्रदोष काळात शिव-पार्वतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

advertisement

तिथी आणि शुभ मुहूर्त (14 फेब्रुवारी 2026) -

त्रयोदशी तिथीची सुरुवात: 14 फेब्रुवारी, पहाटे 4:04 पासून

त्रयोदशी तिथीची समाप्ती: 15 फेब्रुवारी, दुपारी 5:07 पर्यंत

प्रदोष पूजा मुहूर्त: संध्याकाळी 5:34 ते रात्री 8:11 पर्यंत

पूर्ण 1 महिना भयंकर त्रास-अडचणी! सूर्याचा शनिच्या राशीतील प्रवेश 3 राशींना भारी

advertisement

दिवसाचे इतर महत्त्वाचे मुहूर्त -

ब्रह्म मुहूर्त: 05:18 AM ते 06:09 AM

अभिजित मुहूर्त: 12:13 PM ते 12:58 PM

गोधूलि मुहूर्त: 06:08 PM ते 06:34 PM

अमृत काल: 01:03 PM ते 02:47 PM

पूजा विधी - सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. जवळच्या शिव मंदिरात जाऊन महादेव आणि माता पार्वतीची पूजा करावी. मुख्य पूजा प्रदोष काळात (सूर्यास्ताच्या वेळी) केली जाते. शिवलिंगावर जल, दूध, दही, मध आणि साखर अर्पण करून अभिषेक करावा. बेलपत्र, अक्षत (अखंड तांदूळ), फुले आणि चंदन अर्पण करावे.

advertisement

शनिदेवासाठी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यांना काळे तीळ अर्पण करावेत. महामृत्युंजय मंत्र किंवा 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा.

सुखाची लाईफ..! बुध-गुरुचा नवपंचम योग 5 राशींना लकी, आनंदाला उरणार नाही पारावार

advertisement

प्रदोष व्रत मंत्र -

ॐ नमः शिवाय

महामृत्युंजय मंत्र: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

महादेवाचे मंत्र -

ॐ नमः शिवाय

ॐ श्रां श्रीं श्रौं सः सोमाय नमः

ऊँ ऐं ह्रीं शिव-गौरीमय-ह्रीं ऐं ऊँ

ऊँ नमो धनदाय स्वाहा

शिवजी रुद्र मंत्र:

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

प्रदोष स्तुति:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

शिवाय नमस्तुभ्यं प्रदोषं पूजितं मया। क्षमस्व अपराधं मे करुणासागर प्रभो॥

मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani Pradosh Vrat 2025: सिद्धी योगात आज शनिप्रदोष व्रत! शंभूदेवाच्या पूजेचे महत्त्व, विधी-शुभ मुहूर्त, मंत्र पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल