TRENDING:

श्रावणात शिवलिंगाची पूजा का करावी? तज्ज्ञांनी सांगितलं पूजेचं महत्व आणि फायदे

Last Updated:

श्रावण महिना भगवान शंकराचा आवडता महिना असल्यानं या महिन्यातल्या शिवपूजेचं विशेष महत्त्व आहे. शिवलिंगाच्या पूजेचं महत्त्व काय आहे, त्याचे काय फायदे आहेत, याबाबत शिवपुराणात काय सांगण्यात आलंय, ते जाणून घेऊ या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
श्रावणात भाविक विधीवत भगवान शंकराची पूजा करतात. शिवमंदिरांमध्ये श्री शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो, रुद्राभिषेकही केला जातो. पवित्र नद्यांचं पाणी शिवलिंगाला अर्पण केलं जातं. श्रावण महिन्याव्यतिरिक्त तुम्ही वर्षभरदेखील शिवलिंगाची पूजा करू शकता. श्रावण महिना भगवान शंकराचा आवडता महिना असल्यानं या महिन्यातल्या शिवपूजेचं विशेष महत्त्व आहे. शिवलिंगाच्या पूजेचं महत्त्व काय आहे, त्याचे काय फायदे आहेत, याबाबत शिवपुराणात काय सांगण्यात आलंय, ते जाणून घेऊ या.
advertisement

शिवलिंगाचं महत्त्व : 

शिवपुराणानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी कीर्तन, श्रवण आणि मनन करणं सोपं नसतं. त्यासाठी योग्य गुरूची आवश्यकता असते. गुरूंच्या मुखातून येणारे शब्द माणसाच्या शंकांचं निरसन करतात. गुरू ज्या प्रकारे भगवान शंकराच्या तत्त्वाचं वर्णन करतात, तसंच भगवान शंकराचं स्वरूप, तत्त्वज्ञान, गुण इत्यादींचं दर्शन माणसाला होतं असतं. तरच भक्ताला कीर्तन करता येतं; पण असं करणं शक्य नसल्यास भगवान शंकराची मूर्ती किंवा शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करावी. असं केल्यानं व्यक्तीला उत्तम लाभ मिळतो. भगवान शंकराच्या कलात्मक मूर्तीची पूजा करण्याची आज्ञा वेदांमध्येही देण्यात आलीय. इतर देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा केली जाते; मात्र भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग या दोन्हींची पूजा करण्यात येते. मुळात शिवलिंगाचं स्वरूप भगवान शंकराच्या ब्रह्मरूपाची जाणीव करून देतं. शिवलिंग हे भगवान शंकराचं रूप आहे.

advertisement

हे आहेत शिवलिंग पूजेचे फायदे : 

शिवपुराणानुसार भगवान शंकराने ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूला सांगितलं होतं, की लिंगाच्या रूपात प्रकट होऊन ते खूप मोठे झाले. त्यामुळे भूतळ ‘लिंग स्थान’ या नावानं प्रसिद्ध झालं. भाविकांना त्याची पूजा करता यावी, यासाठी हे अनंत ज्योतिस्तंभ किंवा ज्योतिर्मय लिंग खूपच लहान होईल. शिवपुराणात असं सांगण्यात आलं आहे, की, ‘ज्योतिर्मय लिंग सर्व प्रकारचे भोग आणि मोक्ष प्रदान करण्याचं एकमेव साधन आहे. त्याचं दर्शन, स्पर्श आणि ध्यान भाविकांना जन्म-मृत्यूच्या दु:खापासून मुक्त करतं. ज्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन झाले ते ठिकाण अरुणाचल म्हणून ओळखलं जाईल. तिथे मोठी तीर्थक्षेत्रं प्रकट होतील. तिथे मोक्ष प्राप्त होईल.’

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

जो कोणी शिवलिंगाची स्थापना करून त्याची पूजा करतो, त्याला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो. त्याला संसारातून मुक्ती मिळते. तो परमानंदाचा अनुभव घेतो, त्याला शिवलोकाची प्राप्ती करतो, म्हणजेच तो शिवस्वरूप होतो.

मराठी बातम्या/अध्यात्म/
श्रावणात शिवलिंगाची पूजा का करावी? तज्ज्ञांनी सांगितलं पूजेचं महत्व आणि फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल