देवघर : पितृपक्ष सुरू झाला आहे. हा कालावधी पितरांच्या प्रति आपली आस्था प्रकट करण्याचा असतो. या कालावधीत पितर पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. मात्र, अनेकांना तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान यामधील नेमकं अंतर काय आहे, हे माहिती नसते. त्यामुळे काही लोकांकडून चुका होण्याचीही शक्यता असते. म्हणून देवघरचे ज्योतिषाचार्य यांनी कोणत्या वेळी कुणी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करावे?, याबाबत माहिती दिली.
advertisement
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी लोकल18 शी बोलताना याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे. पितृपक्षात आपल्या पितरांच्या नावाने तर्पण अवश्य करायला हवे. कारण ते 15 दिवस पृथ्वीवर राहतात. अशी मान्यता आहे की, यादरम्यान, पितरांच्या नातेवाईकांनी जर पूर्वजांच्या निमित्ताने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केले तर त्यांना मोक्ष मिळतो. मात्र, याआधी नेमकी ही पद्धत काय आहे, हे माहिती असायला हवे.
पितृपक्षात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचे महत्त्व काय -
श्राद्धाचा अर्थ : श्राद्धाचा अर्थ असा होतो की, मृत्यूनंतर 10 दिवसांनी भक्तिभावाने केलेल्या विधीला श्राद्ध म्हणतात. यामध्ये लोकांना जेवण दिले जाते आणि पूर्वजांच्या स्मरणार्थ इतर पारंपारिक विधी केले जातात. श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात. पितृ पक्षाच्या काळात, ब्राह्मणांनी त्यांच्या पूर्वजांच्या तिथीला श्राद्ध जेवण द्यावे. यामुळे पितर प्रसन्न होतात.
ड्रायव्हिंगपासून ड्रॅगनपर्यंत, बीडचा शेतकरी मालामाल, वर्षाला कमावतोय 11 लाखांचं उत्पन्न, VIDEO
पिंडदानाचा अर्थ : पिंडदानाचा अर्थ असा होतो की, पिंडाचे दान करणे म्हणजे मृत पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती देणे. यामध्ये पिठाचा गोल आकार तयार केला जातो, त्याला पिंड म्हणतात आणि हे पिंड दान केले जाते. पूर्वज हे अन्न गाय, कावळा, कुत्रा, मुंगी किंवा देवाच्या रूपात स्वीकारतात, असे मानले जाते. अन्नाचे पाच भाग बाहेर काढले जातात. यामुळे पितरांची मुक्तता होते. गया याठिकाणी पिंडदान केले जाते. ज्यांना गयाला जाता येत नाही, ते नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली पिंडदान करू शकतात.
pitru paksha 2024 : पितृपक्षातील ‘या’ 4 तिथी फार महत्वाच्या, या दिवसात नेमकं काय करावं, VIDEO
तर्पण का अर्थ : देव, ऋषि और मनुष्य, असे तर्पणाचे तीन प्रकारचे असतात. आपल्याला वर्षभर तर्पण करायला हवे. तसेच जर वर्षभर तर्पण करू शकत नसतील तर कमीत कमी पितृपक्षात पितरांच्या नावाने तर्पण नक्की करावे. तर्पण करताना हातात तीळ, पाणी, गवत आणि तांदूळ घेऊन पितरांना प्रार्थना करावी की, त्यांनी जल ग्रहण करावे. यामुळे पितर प्रसन्न होतात. पितृ पक्षाच्या काळात तर्पण क्रिया घरीच करता येते. साधारणपणे कोणताही मुलगा आपल्या पूर्वजांसाठी हे करू शकतो.
Disclaimer : या बातमी दिलेली माहिती ही राशी-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांसोबत संवाद करुन लिहण्यात आली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.