TRENDING:

Guru Pradosh: नवीन वर्षाची सुरुवात प्रदोषावर! सालभर शिवकृपेसाठी अशा गोष्टी करण्याची परंपरा

Last Updated:

Guru Pradosh Vrat: प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळी ही पूजा केली जाते. सूर्यास्तापासून प्रदोष काळ सुरू होतो. जेव्हा त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळ एकत्र येतात, तो वेळ शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. प्रदोष व्रत आठवड्याच्या ज्या दिवशी येते, त्या दिवसावरून त्याचे नाव ठरवले जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : यंदा नवीन साल प्रदोषावर सुरू होत आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार असून या दिवशी गुरुप्रदोष व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत साजरे केले जाते. महिन्यात दोनदा येणारे प्रदोष व्रत एक शुक्ल पक्षात आणि दुसरे कृष्ण पक्षात येते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करण्याची धार्मिक परंपरा आहे.
News18
News18
advertisement

प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळी ही पूजा केली जाते. सूर्यास्तापासून प्रदोष काळ सुरू होतो. जेव्हा त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळ एकत्र येतात, तो वेळ शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. प्रदोष व्रत आठवड्याच्या ज्या दिवशी येते, त्या दिवसावरून त्याचे नाव ठरवले जाते. यावेळी प्रदोष व्रत गुरुवारी येत असल्याने याला गुरुप्रदोष असे म्हटले जात आहे.

advertisement

गुरु प्रदोष व्रत 2026 तिथी आणि महत्त्व -

गुरु प्रदोष व्रत 1 जानेवारी 2026 रोजी साजरे केले जाईल. प्रदोष व्रत गुरुवारी येते, तेव्हा त्याला गुरु प्रदोष किंवा बृहस्पती प्रदोष म्हणून ओळखले जाते. हे व्रत आध्यात्मिक प्रगती आणि धर्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गुरु प्रदोष व्रत केल्याने ज्ञान, शिक्षण, संपत्ती, धर्म आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. पुराणांनुसार, त्रयोदशीच्या रात्रीच्या पहिल्या प्रहरात जो व्यक्ती भगवान शिवाची पूजा करतो, त्याच्या सर्व समस्यांचे निराकरण होते.

advertisement

गुरु प्रदोष 2026 शुभ मुहूर्त - पंचांगानुसार, पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात 1 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वाजून 47 मिनिटांनी होईल. त्रयोदशी तिथीची समाप्ती 1 जानेवारी रोजी रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी होईल. या दिवशी प्रदोष काळ संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 19 मिनिटांपर्यंत असेल. गुरु प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 19 मिनिटांपर्यंत राहील.

advertisement

गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी शिवपिंडीवर पिवळे चंदन आणि हळद अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासोबतच महादेवाला पिवळी कनेरची फुले आणि हरभरा डाळ अर्पण केल्याने गुरु ग्रहाचे दोष दूर होतात. या सोप्या उपायामुळे कुंडलीतील गुरु बलवान होऊन शिक्षण, ज्ञान आणि धनसंपत्तीत वृद्धी होते. 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा विधी केल्यास वर्षभर सुख-समृद्धी लाभते.

advertisement

धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जानेवारी महिना कोणासाठी लकी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिवारी डाळिंबाला उच्चांकी भाव, शेवग्याचं मार्केट हाललं, गुळाचे दर काय?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Guru Pradosh: नवीन वर्षाची सुरुवात प्रदोषावर! सालभर शिवकृपेसाठी अशा गोष्टी करण्याची परंपरा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल