मात्र, स्वस्तिक कसे बनवावे आणि कोणत्या दिशेला बनवावे याची माहिती फार कमी लोकांना असते. असे म्हटले जाते की ज्या घराच्या दारावर हे चिन्ह असते तिथे देवी-देवतांचा वास असतो आणि नकारात्मकता दूर राहते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांच्याकडून जाणून घेऊया, वास्तुनुसार स्वस्तिक बनवण्याचा योग्य नियम आणि दिशा काय आहे.
advertisement
स्वस्तिक बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. स्वस्तिक अनेक गोष्टींपासून बनवता येते, पण वास्तुशास्त्रानुसार हळद आणि कुंकू वापरून स्वस्तिक बनवणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सुख-शांती नांदते.
स्वस्तिक बनवण्यासाठी ईशान्य दिशा शुभ मानली जाते. या दिशेला बनवलेले स्वस्तिक खूपच शुभ आणि फायदेशीर असते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक बनवताना देव्हाऱ्याच्या प्रवेशद्वारावरही स्वस्तिक अवश्य बनवावे. असे केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद कायम राहतात.
संघर्षाची सवय झाली होती! या मूलांकाचे आता भाग्य उजळणार, खुशखबर-आर्थिक लाभ
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि देव्हाऱ्यात स्वस्तिक चिन्ह बनवल्याने वास्तुदोष दूर होतात. स्वस्तिक बनवताना त्याची लांबी चार बोटे आणि रुंदी चार बोटे असावी. मंदिरात-देव्हाऱ्यात हळदीने स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मकता येते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते.
राशी बदलून शनिचा उदय! या राशींच्या खूप काही पथ्यावर पडणार, भाग्य उजळण्याचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
