अक्कलकोट मंदिर 20 तास खुले
सणासुदीच्या काळात अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे पहाटे 3 ते रात्री 11 असे नियमितपणे 20 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
गाणगापूर मंदिरात 18 तास दर्शन
श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक, पालखी, मंगलस्नान असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे 3 ते रात्री 9 असे 18 तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. पहाटेपासून दुपारी 12 पर्यंत विधिवत पूजा, अभिषेक असणार आहे. एक वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे.