हे मंदिर केवळ विसाव्याचं ठिकाण नसून, 850 वर्षांचा पुरातन इतिहास लाभलेलं एक तीर्थक्षेत्र आहे. निवडुंगा विठोबा मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती ही स्वयंभू असून तिच्या डाव्या हातात कमळ, उजव्या हातात शंख, गळ्यात माळ आणि अंगावर जानवे आहे. ही मूर्ती निवडुंगाच्या झाडात सापडल्यामुळे या मंदिराला निवडुंगा विठोबा असे नाव प्राप्त झाले आहे.
advertisement
Ashadhi Wari 2025: पंढरीची वारीच का? कोल्हापूरच्या वारकऱ्याचे बोल लय भारी, तुम्हीही म्हणाल जय हरी!
पालखी सोहळ्याची ही 340 वी परंपरा असून संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी या परंपरेची सुरुवात केली होती. तेव्हापासून ही अखंड परंपरा अखंड श्रद्धेने आणि भक्तिभावाने चालू आहे. वारी हा कुठलाही इव्हेंट नाही. याला ना ऑर्गनाइजर असतो ना तिकीट लागतं, तरीही लाखो लोक स्वतःहून सहभागी होतात, हीच खरी भक्ती आहे, असे पालखी सोहळा प्रमुख रविंद्र पाद्य यांनी सांगितले.
मंदिर परिसरात राहण्याची, जेवणाची, आणि वैद्यकीय सेवा यांची संपूर्ण व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. महिला वारकऱ्यांसाठी महिला आयोगाच्या वतीने हिरकणी कक्ष देखील उभारण्यात आला आहे.
वारी ही संतांची देणगी असून, साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा ही भावना प्रत्यक्षात अनुभवायला मिळते. या पवित्र ठिकाणी वारकऱ्यांना भक्ती, सेवाभाव, आणि सामूहिक साधनेचा संगम अनुभवायला मिळतो. निवडुंगा विठोबा मंदिराचा इतिहास आणि वारीतील त्याचे महत्त्व, दोघेही वारकऱ्यांच्या श्रद्धेला अधिक बळ देतात.