Ashadhi Wari 2025: पंढरीची वारीच का? कोल्हापूरच्या वारकऱ्याचे बोल लय भारी, तुम्हीही म्हणाल जय हरी!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Ashadhi Wari 2025: कोल्हापूरच्या वासकर महाराज फडाची दिंडी ही केवळ वारीतील एक सहभाग नसून, ती वारी संस्कृतीचा एक वारसा आहे. या दिंडीचा सुरुवात 45 वर्षांपूर्वी झाली
पुणे : पावसाळा सुरू झाला की आषाढी वारीचे वेध लागतात. पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी प्रवास करतात. ‘माऊली माऊली’चा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि हरिनामाचा जयघोष करत वारकरी भक्तीच्या मार्गावर पुढे निघालेले असतात. या भक्तिमय वातावरणात गेली 45 वर्ष अखंडपणे सहभागी होत असलेली कोल्हापूरची वासकर महाराज फड ही दिंडी यंदाही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली आहे.
वासकर महाराज फडाची दिंडी ही केवळ वारीतील एक सहभाग नसून, ती वारी संस्कृतीचा एक वारसा आहे. या दिंडीचा सुरुवात 45 वर्षांपूर्वी झाली असली तरी, यामागे असलेली वारकरी भक्ती यापेक्षा अधिक वर्षांची आहे. वारी ही आमचं जीवन आहे, आमचं सौख्य नामस्मरणात आहे, असं वक्तव्य या फडाचे चोपदार दिनकर पाटील यांनी केलं.
advertisement
आधी माणसं कमी...
पाटील पुढे सांगतात, सुरुवातीच्या काळात आमच्या दिंडीत फक्त 50-60 वारकरी होते, पण आज 300 हून अधिक भाविक या दिंडीत सहभागी होत आहेत. आधी माणसं कमी होती, पण ती सात्विक होती, एका तत्वाने चालणारी होती. वारीतून आम्हाला केवळ आध्यात्मिक समाधान नाही तर मानसिक, शारीरिक आणि ज्ञानाचेही समाधान मिळते.
advertisement
हेच फडाच्या यशाचं गमक
पैशाने न मिळणाऱ्या समाधानाची अनुभूती या वारकरी प्रवासातून मिळते, हेच या वासकर फडाच्या यशाचं गमक आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या सोबतीने हे वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने चालताना आपल्या आयुष्यात भक्ती, शिस्त आणि साधेपणाचं उदाहरण घालून देतात. वारी ही फक्त परंपरा नाही, ती जीवनशैली आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वासकर फडाची ही 45 वर्षांची अखंड वारी आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 20, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: पंढरीची वारीच का? कोल्हापूरच्या वारकऱ्याचे बोल लय भारी, तुम्हीही म्हणाल जय हरी!