Ashadhi Wari 2025: जालना ते पंढरी सायकल वारी, 5000 वारकऱ्यांचं खास रिंगण, पाहा Video

Last Updated:

Ashadhi Wari 2025: आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून वारकरी पंढरीकडे निघाले आहेत. जालन्यातून सायकल वारी निघाली असून पंढरपुरात 5000 जणांचं सायकल रिंगण देखील होणार आहे.

+
Ashadhi

Ashadhi Wari 2025: जालना ते पंढरी सायकल दिंडी, 5000 वारकऱ्यांचं खास रिंगण, कशी असणार ही वारी?

जालना: आषाढी वारीनिमित्त पांडुरंग भेटीच्या ओढीने राज्यभरातील वारकरी विविध पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई यांच्या पालख्यांचं पंढरीच्या दिशेनं रवाना होत आहेत. जालना शहरातील तब्बल 25 सायकल प्रेमी एकत्र येत सायकल वारीच्या माध्यमातून पंढरीकडे जात आहेत. तर राज्यभरातील तब्बल 5000 सायकल प्रेमी पंढरपूर येथे सायकल रिंगण करणार आहेत. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
जालना शहरातील 25 सायकल प्रेमी 20 जून रोजी सकाळी सहा वाजता जालना शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. आमची ही तिसरी सायकलवारी आहे. पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि आपले शरीर तंदुरुस्त रहावे हा संदेश घेऊन आम्ही ही वारी घेऊन जात आहोत. राज्यभरातील तब्बल 5000 लोक पंढरपूर मध्ये एकत्र जमून सायकल रिंगण देखील करणार आहेत, असं सायकलिस्ट ग्रुप जालनाचे प्रशांत भाले यांनी सांगितलं.
advertisement
कशी असणार सायकल वारी?
जालना ते पंढरपूर हे अंतर 310 किमी आहे. तीन दिवसांची ही वारी असून दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिला मुक्काम हा कुंथलगिरी येथे करण्यात येणार असून दुसरा मुक्काम थेट पंढरपुरात असणार आहे. जालना, वडीगोद्री, अंबड, बीड, कुंथलगिरी, बार्शी, येरमाळा, कुर्डूवाडी असा प्रवास असणार आहे. सगळ्यांनी सायकल चालवावी, सायकल चालवण्याचे शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी अनेक फायदे आहेत. यासाठी ही सायकलवारी असल्याचं सायकलिस्ट ग्रुपचे अध्यक्ष भाले यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ashadhi Wari 2025: जालना ते पंढरी सायकल वारी, 5000 वारकऱ्यांचं खास रिंगण, पाहा Video
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement