काय आहे मंदीराचा इतिहास?
दोन द्वारपाल असलेले जगदंबा माताचे मंदिर बाराव्या शतकात बांधले असल्याचे सांगितले जाते. मंदिर हेमाडपंथी पद्धतीने दगडाच्या सहाय्याने कोरीव काम करून बांधलं आलेले आहे. याठिकाणी पार्वती मातेने चंड मुंड या राक्षसांचा वध करून मातेने येथे ठान मांडलं म्हणून या गावाला ठाणेगाव असे नाव पडले असल्याचे सांगितले जाते. या देवीकडे केलेला नवस पूर्ण होतो. आई जगदंबा नवसाला पावते त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात, असं जगदंबा माता देवस्थान कमिटी सचिव दिलीप ठाकरे यांनी सांगितले.
advertisement
विदर्भातील या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास, योगी आदित्यनाथांशी आहे खास कनेक्शन
गाभाऱ्यात 2 मुकुट कोणाचे?
या मंदिरातील गाभाऱ्यात मूर्तीचे 2 मुकुट बघून भाविकांचा थोडा गोंधळ होतो मात्र समोरील मुकुट हे सिंहाचे असून त्यावर जगदंबा माता स्वार असल्याचं सांगितलं जातं. देवी ही स्वयंभू आहे आणि समोरच महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर वाघाच्या दगडी मूर्ती आहे. आतमध्ये प्रवेश करताच पुरातन पद्धतीने दगडी खांब असलेला सभामंडप आहे. गाभारा खोल असला तरी दुरूनच जगदंबा मातेचे दर्शन होते. आई जगदंबेचे रूप तिचा साज बघून मन प्रसन्न होते.
अशीही सांगितली जाते कथा
ऐतिहासिक कथा अशी की करंज्याच्या जवळ असलेलं नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील चंडिका माता, ठाणेगाव येथील जगदंबा माता आणि कारंजा तालुक्यातीलच येणगाव येथील जल देवी माता, हे तीन हि मंदिर एकाच रात्री बांधण्यात आले होते. दिवस उजाडताच फक्त येनगाव येथील मंदिर अर्धवट राहिले होते. त्यामुळे मंदिराची प्रचिती परिसरात आहे. याठिकाणी नागपूर, काटोल, वर्धा, कारंजा यासह विविध ठिकाणांहून भक्त दर्शनासाठी येतात आणि आपल्या प्रार्थना आई जगदंबेकडे करतात.
नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी का फुंकतात घागरी? पाहा काय आहे महत्त्व Video
वर्षभर उत्साहात होतात कार्यक्रम
वर्षभरात चैत्र आणि शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या प्रमाणात होतो. शेकडो घट आणि अखंड ज्योती लावल्या जातात. जे तेजस्वी दृश्य अगदी डोळ्यात समावते. कार्तिक महिन्यात काकड आरती आणि पूजा पाठ चालतो आणि पौर्णिमेला भंडारा होतो, अशी माहितीही दिलीप ठाकरे यांनी दिली.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)