धार्मिक पुस्तके - वास्तुशास्त्रानुसार, धार्मिक पुस्तके बेडरूममध्ये ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार, आपण गीता, कुराण, बायबल यांसारखी धार्मिक पुस्तके पूजास्थळी देव्हाऱ्यात श्रद्धेने ठेवली पाहिजेत. बेडरूम ही विश्रांतीची जागा आहे, ही पुस्तके येथे ठेवल्याने त्यांचा अनादर होऊ शकतो.
झाडू - वास्तुशास्त्रानुसार झाडू बेडरूममध्ये ठेवू नये. झाडू स्वच्छतेशी संबंधित आहे, परंतु तो घराच्या महत्त्वाच्या ठिकाणांपासून दूर ठेवावा. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास घरात पैशाची कमतरता भासू शकते. बाहेरील व्यक्तीच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीनं झाडू ठेवावा.
advertisement
तीक्ष्ण-धारधार गोष्टी - वास्तुनुसार, बेडरूममध्ये चाकू, कात्री किंवा इतर तीक्ष्ण वस्तू ठेवू नयेत. या गोष्टी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे घरात तणाव आणि भांडणे होऊ शकतात. या गोष्टी घराच्या इतर भागात ठेवाव्यात, जेणेकरून बेडरूममधील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील.
कष्ट-संघर्षातून इथंवर आलोय! या राशींचे आता उजळणार भाग्य; बुध-गुरूची कृपा पाठिशी
देवतांच्या मूर्ती - वास्तुनुसार, बेडरूममध्ये देवी-देवतांच्या मूर्ती ठेवणे देखील योग्य मानले जात नाही. हे ठिकाण विश्रांतीसाठी असल्यानं पूजास्थळी मूर्ती ठेवाव्यात. बेडरूममध्ये मूर्ती ठेवल्याने धार्मिक वातावरण बिघडू शकते आणि मानसिक शांती प्रभावित होऊ शकते.
मृत व्यक्तींचे फोटो - वास्तुनुसार, बेडरूममध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. याचा तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि तुमची शांती भंग होऊ शकते. मृत व्यक्तीचे फोटो इतर ठिकाणी दक्षिण दिशेला लावावे, याने घराचे वातावरण सकारात्मक आणि शांत राहील.
4 शुभ योगांमध्ये शनिप्रदोष व्रत! शिव कृपेनं इच्छापूर्ती; पहा मुहूर्त-राहुकाल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)