सर्वात प्रभावी मीठ कोणते?
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, नजर काढण्यासाठी सैंधव मीठ सर्वात श्रेष्ठ मानले जाते. सैंधव मीठ हे नैसर्गिक आणि शुद्ध स्वरूपात असते, त्यामुळे त्यात नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता पांढऱ्या किंवा काळ्या मिठापेक्षा कित्येक पटीने जास्त असते. खडा मीठ उपलब्ध असल्यास त्याचा प्रभाव अधिक जलद होतो.
पांढरे आणि काळे मीठ
advertisement
जर सैंधव मीठ उपलब्ध नसेल, तर आपण घरातील साधे पांढरे मीठ वापरू शकतो. मात्र, तंत्रशास्त्रात काळ्या मिठाचा वापर विशेषतः 'बळी' किंवा 'टोटके' करण्यासाठी केला जातो. सामान्य घरातील नजर काढण्यासाठी सैंधव किंवा पांढरे खडा मीठच उत्तम ठरते.
कोणत्या हाताने नजर काढावी?
नजर काढताना नेहमी उजव्या हाताचा वापर करावा. उजव्या हातात मीठ घेऊन ज्याची नजर काढायची आहे त्याच्या समोर उभे राहावे. नजर काढणाऱ्याने आपली मुठ बंद ठेवावी जेणेकरून शोषलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पसरणार नाही.
नजर काढण्याची अचूक पद्धत
ज्या व्यक्तीला नजर लागली आहे, त्याला समोर बसवावे किंवा उभे करावे. त्यानंतर उजव्या हातात मीठ घेऊन त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ७ वेळा गोल फिरवावे. काही ठिकाणी 7 वेळा सरळ आणि 7 वेळा उलट फिरवण्याचीही पद्धत आहे, ज्यामुळे नकारात्मकता मुळापासून निघून जाते असे मानले जाते.
मिठाचे विसर्जन कोठे करावे?
नजर काढल्यानंतर ते मीठ तात्काळ घराबाहेर टाकणे आवश्यक आहे. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ते मीठ वाहत्या पाण्यात किंवा बेसिनमध्ये नळ सोडून वाहून द्यावे. मिठाचा स्पर्श पाण्याच्या प्रवाहाशी आल्यावर ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. काही लोक हे मीठ आगीत जाळतात, ज्यामुळे नजर लागलेल्या व्यक्तीला त्वरित आराम मिळतो.
पूरक वस्तूंचा वापर
नजर जर खूप कडक असेल, तर केवळ मिठाऐवजी मीठ, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या एकत्रितपणे हातात घेऊन नजर उतरावी. या वस्तू नंतर आगीत जाळाव्यात. जर मिरचीचा ठसका आला नाही, तर समजावे की नजर खरंच खूप तीव्र होती.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
