फुटलेल्या बांगड्या फेकू नका
बांगड्या घालणे हे केवळ सौंदर्यासाठी नसून, त्या हिंदू स्त्रियांकरिता पवित्र अलंकार मानल्या जातात. विवाहित महिलांनी नेहमी बांगड्या घालाव्यात असे सांगितले जाते. जर बांगडी फुटली किंवा तडा गेला, तर ती फेकू नये. बांगड्या फुटल्यास, त्या लाल कापडात गुंडाळून पिंपळ किंवा इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी पुराव्यात.
बांगड्या आणि तांत्रिक प्रयोग
advertisement
धार्मिक मान्यतेनुसार, फुंटलेल्या बांगड्यांचा वापर अनेकदा तांत्रिक प्रयोगांमध्ये केला जातो. जर कोणी तुमच्या फुटलेल्या बांगड्यांवर असे प्रयोग केले, तर त्याचा परिणाम तुमच्यावर आणि तुमच्या पतीवर होऊ शकतो. म्हणून, बांगड्या योग्य प्रकारे झाडाच्या मुळाशी पुरून टाकाव्यात, जेणेकरून त्यांचा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेसाठी वापर होणार नाही.
बांगड्यांचा आणि आरोग्याचा संबंध
केवळ सौंदर्यच नव्हे, तर आरोग्यासाठीही बांगड्या उपयुक्त मानल्या जातात. बांगड्यांमधून येणाऱ्या 'खन खन' आवाजामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी महिलांच्या मानसिक स्थैर्यास मदत करते. जर स्त्रिया बांगड्या घालत नसतील, तर त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे विवाहित महिलांनी बांगड्या घालण्याची सवय ठेवावी.
अविवाहित मुलींच्या तुटलेल्या बांगड्यांबाबत नियम
जर अविवाहित मुलींच्या बांगड्या फुटल्या, तर त्यांना फेकण्यात काहीच अडचण नाही. मात्र, त्या सरळ कचऱ्यात न टाकता लाल कापडात गुंडाळून झाडाच्या मुळाशी पुराव्यात. असे केल्याने भविष्यातील वैवाहिक जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
विशेष दिवस आणि बांगड्यांचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार, विशेष दिवसांवर बांगड्या घालणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे, महिलांनी पूजाअर्चा, धार्मिक कार्य, नवरात्र, करवा चौथ आणि इतर शुभ प्रसंगी बांगड्या घालाव्यात, यामुळे सुख-समृद्धी आणि सौभाग्य वृद्धिंगत होते. बांगड्या या केवळ अलंकार नसून स्त्रीच्या सौभाग्य, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेशी निगडीत असतात. त्यांच्याशी संबंधित नियमांचे पालन केल्यास, जीवनात शुभता आणि सौभाग्य कायम राहते.
हे ही वाचा : कंगाल होत चाललाय? धनप्राप्तीसाठी काळ्या हळदीचे करा हे 5 उपाय, लक्ष्मी होईल प्रसन्न, उजळून निघेल भाग्य
हे ही वाचा : कोर्टाच्या कामात यश मिळत नाहीये? तर 'हे' 4 उपाय नक्की करा, 100% तुमच्या बाजुने लागेल निकाल
