कंगाल होत चाललाय? धनप्राप्तीसाठी काळ्या हळदीचे करा हे 5 उपाय, लक्ष्मी होईल प्रसन्न, उजळून निघेल भाग्य
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र आणि गुरूचा अशुभ प्रभाव असतो, त्यांना आर्थिक अडचणी येतात. काळ्या हळदीचे काही उपाय केल्यास धनलाभ होऊ शकतो. काळ्या हळदीचे सात तुकडे पिवळ्या कपड्यात बांधून पूजास्थानी ठेवावेत.
जर तुमच्या कुंडलीत शुक्र आणि गुरू ग्रहांचे अशुभ परिणाम असतील, तर देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊ शकतात. असे लोक कायम आर्थिक तंगीचा सामना करतात. मात्र, ज्या लोकांवर शुक्राची कृपा असते, त्यांचं जीवन समृद्ध आणि ऐश्वर्यवान होतं. आज आम्ही तुम्हाला काळी हळद वापरून धनप्राप्तीचे काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. महारिषी पाणिनी संस्कृत आणि वैदिक विद्यापीठ, उज्जैनचे ज्योतिष तज्ज्ञ डॉ. मृत्युञ्जय तिवारी यांनी हे उपाय सांगितले आहेत.
धनप्राप्तीसाठी हे आहेत काळ्या हळदीचे उपाय
पूजा स्थळी काळी हळद ठेवा
शुक्ल पक्षातील चतुर्दशीला 7 गठ्ठे काळी हळद पिवळ्या कपड्यात बांधा आणि आपल्या पूजास्थळी ठेवा. लक्ष्मी आणि श्रीहरि विष्णूच्या मंत्रांचा जप करून हळदीची पूजा करा. दुसऱ्या दिवशी ती हळद आपल्या पैशाच्या ठिकाणी, तिजोरीत किंवा रोख रकमेसाठी ठेवलेल्या जागी ठेवा. या उपायाने तुमच्या धनात वाढ होईल.
advertisement
व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी
व्यवसायात सतत तोटा होत असेल आणि प्रगतीचा मार्ग मिळत नसेल, तर गुरुवारी एक पिवळा कपडा घ्या. त्यात 11 गोमती चक्र, 11 पिवळ्या कवड्या, चांदीचे नाणे आणि 11 काळी हळदीचे तुकडे ठेवा. त्यानंतर हे गाठोडे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसमोर ठेवा आणि "ॐ नमो भगवते वासुदेवाय" मंत्राचा जप करा. पूजा झाल्यानंतर हे गाठोडे तुमच्या व्यवसायाच्या कॅश बॉक्समध्ये ठेवा. महालक्ष्मीच्या कृपेने व्यवसायात प्रगती होईल.
advertisement
समृद्धीसाठी तिजोरीत काळी हळद ठेवा
पुष्य नक्षत्र असलेल्या गुरुवारी लाल कपड्यात लाल कुंकू, काही नाणी आणि काळी हळद ठेवा. ही पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा. या उपायामुळे घरात समृद्धी आणि आर्थिक भरभराट होईल.
धनलाभासाठी स्वस्तिक बनवा
बुधवारी काळी हळद आणि केशर वाटून त्यात गंगाजल मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टने लक्ष्मी-नारायणाच्या नावाचा जप करत तिजोरीवर किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह काढा. हा उपाय व्यापाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. नवीन आर्थिक संधी मिळतील.
advertisement
लक्ष्मी-विष्णूच्या कृपेसाठी उपाय
शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी एक चांदीची डबी घ्या. त्यात काळी हळद, कुंकू आणि नागकेशर ठेवा. त्यानंतर ती डबी जवळच्या मंदिरात घेऊन जा आणि देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांच्या पायांना स्पर्श करून घरी आणा. मग ती डबी तुमच्या तिजोरीत ठेवा. या उपायाने धनवृद्धी होईल, घरात सुख-समृद्धी नांदेल. वरील उपाय श्रद्धेने केल्यास देवी लक्ष्मीची कृपा मिळू शकते आणि आर्थिक संकटांवर मात करता येईल.
advertisement
हे ही वाचा : Chanakya Niti: लोक गैरफायदा घेतात! या 5 गोष्टी गुप्त राहण्यातच आपलं भलं, चाणक्यांनी सांगून ठेवलंय
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
कंगाल होत चाललाय? धनप्राप्तीसाठी काळ्या हळदीचे करा हे 5 उपाय, लक्ष्मी होईल प्रसन्न, उजळून निघेल भाग्य









