Chanakya Niti: लोक गैरफायदा घेतात! या 5 गोष्टी गुप्त राहण्यातच आपलं भलं, चाणक्यांनी सांगून ठेवलंय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chanakya Niti Marathi: चाणक्य नीतीतील काही गोष्टींमध्ये असेही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टी नेहमी आपल्या मनातच ठेवाव्यात. काही गोष्टी कोणासोबतही शेअर करू नयेत.
मुंबई : आचार्य चाणक्य हे खूप बुद्धिमान आणि ज्ञानी व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःच्या धोरणांद्वारे अनेक लोकांना योग्य मार्गदर्शन केले आहे. आचार्य चाणक्यांच्या काळात लोक दूरदूरून त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असत. त्यांच्या रणनीती खूप लोकप्रिय असल्याने, आचार्य चाणक्य हे एक यशस्वी रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. आजच्या काळातील लोक त्यांची नीतिमत्ता आचरणात आणतात. त्यांच्याकडून आयुष्यात खूप काही शिकायला मिळते आणि मार्गदर्शनही मिळते.
चाणक्य नीतीतील काही गोष्टींमध्ये असेही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टी नेहमी आपल्या मनातच ठेवाव्यात. काही गोष्टी कोणासोबतही शेअर करू नयेत. आचार्य चाणक्य म्हणतात की, आपण काही गोष्टी लपवल्या तर त्या आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. अरविंद पचौरी यांच्याकडून जाणून घेऊया, कोणत्या गोष्टी इतरांना सांगू नये.
advertisement
आर्थिक नुकसानाबद्दल कोणालाही सांगू नये-
आचार्य चाणक्य यांच्या मते, शहाणा माणूस तोच असतो, जो आपल्या आर्थिक नुकसानाबद्दल कोणालाही सांगत नाही आणि आपल्या व्यवसायात काही नुकसान झाले आहे किंवा आपले पैसे कुठेतरी वाया गेले असतील तर कोणालाही सांगत नाहीत. लोकांना तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही कळते तेव्हा ते हळूहळू तुमच्यापासून दूर जाऊ लागतात.
advertisement
घरगुती बाबी -
आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने कधीही आपल्या कुटुंबातील गोष्टी बाहेरील व्यक्तीला सांगू नयेत. कारण बाहेरील लोक तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊ शकतात आणि तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करू शकतात. म्हणून, अशी चूक कधीही करू नये.
advertisement
फसवणूक झाली तर कोणालाही सांगू नये -
चाणक्य नीतिनुसार, जर तुम्हाला कधी एखाद्याने फसवले तर तुम्ही ही गोष्ट तुमच्या मनात ठेवावी, ती कोणालाही सांगू नये. तुम्ही हे दुसऱ्या कोणाला सांगितले तर ते तुमची चेष्टा करतील. चार वेळा पुन्हा त्यावर चर्चा करतील आणि उदास व्हावं लागेल.
advertisement
स्वतःचा झालेला अपमान -
आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्ञानी व्यक्ती कधीही आपला अपमान इतरांना सांगत नाही, मग तो कुटुंबातील सदस्य असो किंवा खास व्यक्ती असो, कारण जर तुम्ही तुमचा अपमान इतरांना सांगितला तर ते लोकही तुमचा आदर करणार नाहीत आणि कुठेतरी ते त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हालाही तेच मानू लागतील. म्हणून, ही चूक चुकूनही करू नये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2025 9:26 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chanakya Niti: लोक गैरफायदा घेतात! या 5 गोष्टी गुप्त राहण्यातच आपलं भलं, चाणक्यांनी सांगून ठेवलंय







